नांदेड : नांदेड जिल्हयातील जांब( बु ) जवळील कंधार – जांब या राज्य महामार्गावर कार व दुचाकीचा अपघात होऊन वृध्द पती- पत्नीसह तीन ठार झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातामध्ये एक जखमी असल्यातंही सांगण्यात येत आहे. अधिक माहितीनुसार, सकाळी ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
सध्या एसटी महामंडळाचा संप सुरू असल्याने लोक प्रवासासाठी खाजगी वाहनांचा वापर करताना दिसत आहेत. यातच आठवडी बाजार असल्याने दुचाकीवरुन फुलाबाई राठोड वय ५५ वर्ष, सुर्यकांत राठोड वय ६० वर्ष, संजना राठोड वय ३ वर्ष यापैकी दुचाकीवरील संजना राठोड ही चिमुकली जखमी झाली असुन दोघे जागीच ठार तर फुलाबाई राठोड या जांब बु प्रा.आ. केंद्रात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. पुणे हादरलं! आधी फेसबूक लाईव्ह आणि नंतर १३ व्या मजल्यावरून उडी घेत वेटरची आत्महत्या या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, पोलीस निरीक्षक गजानन काळे, पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर ठाकुर, किरण वाघमारे, मारोती मेकलेवाड घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा केला. तर या घटनेचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी जांब बु प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले आहेत. पोलीस उपनिरीक्षक गजानन काळे यांच्याकडे या घटनेचा तपास देण्यात आला आहे तर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.