भंडारा : पैश्याच्या वादातून दोघांनी आपल्याच मित्राचा खून करून स्वतः पोलिस स्टेशनला पोचले असल्याची घटना समोर आली आहे. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर जवळील मांगली गावातील ही घटना असून शुभम आगासे वय २५ वर्ष या मृताचे नाव आहे.

काल रात्रीला शुभमचे मित्र त्याला सोबत घेऊन गेले. पण मध्यरात्रीनंतरही शुभम घरी परत आलाच नाही. घराच्या लोकांनी शोधाशोध केली असताना आज सकाळी शुभमचा मृतदेह गावाजवळील तलावाजवळ आढळला. चाकूने वार करून त्याचा खून करण्यात आला होता. त्यानंतर आरोपींनी स्वतः तुमसर पोलिसात जाऊन आत्मसमर्पण केलं असून तुमसर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

‘या’ कंपनीपासून सावधान राहा! महिलांना जाळ्यात ओढून सगळे पैसे केले लंपास, आणि आता कंपनीच गायब
पैसाच्या वादातून दोन मित्रणीचा खून केला असल्याचे बोलले जात आहे. तर तुमसर तालुक्यात हत्याच्या घटना घडत असल्याने लोकांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही अशी चर्चा सुरू आहे. तर या विषयी पोलिसांना विचारले असता पोलिसांनी या विषयी बोलण्यास टाळाटाळ केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here