वाचा-
हसन अली आयसीसीच्या आचारसंहितेमध्ये का दोषी आढळला?
खरे तर हे प्रकरण पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याचे आहे. पाकिस्तानसाठी १७ वे षटक टाकणाऱ्या हसन अलीने बांगलादेशचा यष्टिरक्षक फलंदाज नुरुल हसनची विकेट घेतली आणि विचित्रपणे त्याला पॅव्हेलियनमध्ये जाण्यास सांगितले, ज्याला आयसीसीने अनुशासनहीन मानले आहे. तो स्तर-१ साठी दोषी आढळला आणि त्याला १ डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. २४ महिन्यांतील हसन अलीची ही पहिली मोठी चूक आहे. भविष्यातही असेच वर्तन राहिल्यास त्याच्यावर मोठी कारवाई होऊ शकते.
वाचा-
दरम्यान, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात टी-२० मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाने ७ विकेट गमावत १०८ धावा केल्या आहेत. आणि पाकिस्तानपुढे १०९ धावांचे माफक आव्हान ठेवले आहे.
वाचा-
याआधी खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात पाकिस्तानने शेवटच्या षटकात शानदार फलंदाजी करत बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्याचा नायक ठरलेल्या हसन अलीने शानदार गोलंदाजी करताना ३ बळी घेत ‘सामनावीर’चा किताब पटकावला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times