हायलाइट्स:

  • रयत क्रांती संघटनेकडून एसटी बसवर दगडफेक
  • एकरकमी एफआरपी देण्याच्या मागणीवरून संघटना आक्रमक
  • शिवसैनिक व रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकार्‍यांत शाब्दिक चकमक

सांगली : राज्यात मागील काही आठवड्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून या संपामुळे राज्यभरातील वातावरण ढवळून निघालं आहे. संपकाळातही एसटी बस सुरू ठेवल्याने काही ठिकाणी बसेसवर दगडफेक करण्यात आली. सांगलीत मात्र उसाला एकरकमी एफआरपी देण्याच्या मागणीवरून रयत क्रांती संघटनेकडून एसटीवर दगडफेक करण्यात आली आहे. (महाराष्ट्रातील सेंट बसचा संप ताज्या बातम्या)

उसाला एकरकमी एफआरपी मिळावी या मागणीसाठी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज ताकारी (ता. वाळवा) येथे एसटी बसवर दगडफेक केली. याप्रकरणी नंदकुमार शंकर पाटोळे यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, इस्लामपूर आगारात शिवसैनिक व रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकार्‍यांत शाब्दिक चकमक झाली. रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते सागर खोत यांच्यासह पदाधिकार्‍यांना इस्लामपूर पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं.

anil parab: ‘मी महाधिवक्त्यांशी बोलतो, पण आधी संप मागे घ्या’; परिवहन मंत्र्यांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

एसटी कामगारांकडून राज्यभर आंदोलन पुकारण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर १५ दिवसांपासून इस्लामपूर आगारात कामबंद आंदोलन सुरू आहे. आठवड्यापूर्वी इस्लामपूर बसस्थानकातून वाटेगावला एसटी रवाना करण्यात आली होती. ती वाटेगावच्या मुख्य चौकात फोडण्यात आली. त्यामुळे पुन्हा वाहतूक बंद होती. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन शनिवारी इस्लामपूर ते ताकारी मार्गावर एसटीची सेवा सुरू केली. मात्र ताकारीत पोहोचलेल्या एसटीवर रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करत ऊस दर आंदोलनाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. एसटीतील शिवसैनिक व पोलिसांनी नंदकुमार पाटोळे यांचा पाठलाग करत त्यांना ताब्यात घेतलं. एसटीचं नुकसान केल्याप्रकरणी नंदकुमार पाटोळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दुपारच्या सुमारास रयत क्रांती संघटनेचे सागर खोत, मोहसिन पटवेकर, सर्फराज डाके यांच्यासह कार्यकर्त्यांनी इस्लामपूर आगारातील एसटी वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी इस्लामपूर आगारात पोलीस व शिवसैनिक ठाण मांडून होते. त्यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकार्‍यांत शाब्दिक चकमक झाली. पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला केले. रयत क्रांतीचे सागर खोत यांच्यासह पदाधिकार्‍यांना इस्लामपूर पोलिसांनी ताब्यात घेऊन काही वेळानंतर सोडून दिले. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असतानाच आता ऊसदरासाठी सांगली जिल्ह्यातील ऊस पट्ट्यात आंदोलनाची तीव्रता वाढत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here