हायलाइट्स:

  • अल्पवयीन मुलावर जबरदस्ती करून शारीरिक अत्याचार
  • घटनेनं सर्वत्र खळबळ
  • अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक

पुणे : मित्रानेच अल्पवयीन मुलावर जबरदस्ती करून शारीरिक अत्याचार केल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुणे शहरात शुक्रवारी घडलेल्या या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. (Pune Crime Latest News Update)

विकृती माणसाला कुठल्या थरावर नेऊ शकते, याचा अंदाज बांधणं अवघड असतं. पुणे शहरातही विकृतीचं असंच एक उदाहरण समोर आलं असून अल्पवयीन मुलावर त्याच्या मित्रानेच जबरदस्ती करून अनैसर्गिक शारीरिक अत्याचार केल्याची घटना दांडेकर पूल येथे घडली.

सांगलीत वेगळ्याच मुद्द्यावरून झाली एसटी बसवर दगडफेक; नक्की काय घडलं?

तळजाई पठार येथे राहणारा एक अल्पवयीन मुलगा दांडेकर पूल येथे त्याच्या मित्राच्या घरी गेला होता. तेव्हा या मुलाचा जुना मित्र सागर सोनवणे (वय २१ वर्ष) हा तिथं भेटला. ओळखीचा फायदा घेऊन सोनवणे याने अल्पवयीन मुलाला जवळच्या स्वच्छतागृहात नेलं आणि मारहाण करून अनैसर्गिक शारीरिक अत्याचार केले.

आर्यन खान प्रकरण : नवाब मलिक यांच्या नव्या मागणीने वानखेडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता

घरी परतल्यानंतर या घटनेची माहिती पीडित अल्पवयीन मुलाने आपल्या कुटुंबातील सदस्यांना सांगितली. त्यानंतर त्यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडित मुलाच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर आरोपीला तपास पथकाने शोधून अटक देखील केली.

दरम्यान, ज्या अल्पवयीन मुलाबाबत ही घटना घडली त्याच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपीवर कलम ३६३, ३७६, ३७७, ३२३, ५०६ अन्वये बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियन २०१२ कलम ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दत्तवाडी पोलिसांनी दिली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here