हायलाइट्स:

  • प्रवाशांना मोठा दिलासा
  • रेल्वे प्रशासन आजपासून चालवणार स्पेशल ट्रेन
  • संभाव्य गर्दी टाळण्यासाठी घेतला निर्णय

खेड : कोकणात सुट्टीसाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वे प्रशासन आजपासून पनवेल ते मडगाव ही विशेष रेल्वे गाडी (विशेष ट्रेन ताज्या बातम्या) सोडणार आहे. ख्रिसमस व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेगाड्यांना होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने कोकण मार्गावर मडगाव-पनवेल विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २१ नोव्हेंबरपासून ही ट्रेन धावणार आहे.

पनवेल ते मडगाव ही स्पेशल ट्रेन आजपासून ३ जानेवारीपर्यंत दर रविवारी चालवण्यात येणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. ०१५९६/०१५९५ क्रमांकाची ही ट्रेन मडगाव येथून सायंकाळी ४ वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ३ वाजून १५ मिनिटांनी पोहोचेल.

वादात बाळासाहेब थोरात यांनीही घेतली उडी; विक्रम गोखलेंना टोला लगावत म्हणाले…

परतीच्या प्रवासात पनवेल येथून दर सोमवारी सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी सुटून त्याचदिवशी सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी मडगावला पोहोचेल. २२ डब्यांच्या या गाडीला रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमाळी आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने घेतेलल्या या निर्णयामुळे सुट्ट्यांच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टळणार असल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here