हायलाइट्स:

  • हृता दुर्गुळे हिने दिली प्रेमाची कबुली
  • हृताची पोस्ट पाहून चाहत्यांना बसला धक्का
  • सोशल मीडियावर वायरल झालंय भन्नाट मीम

मुंबई– आधी ‘दुर्वा’ नंतर ‘फुलपाखरू’ आणि आता ‘मन उडू उडू झालं’ या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान मिळवणारी अभिनेत्री ऋता दुर्गुळेहिने नुकतीच एक पोस्ट करत चाहत्यांना मोठा धक्का दिला. हृताने तिच्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आपल्या नजरेनेच चाहत्यांना गार करणाऱ्या ऋताला महाराष्ट्राची शान म्हटलं जातं. हृताचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. तरुण चाहते तर ऋताची एक झलक पाहण्यासाठी तरसताना दिसतात. चाहते ऋताची तुलना दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिकासोबत करतात. परंतु, आता ऋताने केलेल्या एका पोस्टने जणू चाहत्यांची मनं तुटली आहेत.
मन उडु उडु झालं! ऋता दुर्गुळेनं दिली प्रेमाची कबुली; ती खास व्यक्ती आहे तरी कोण?
संधी हुकली! मानल गायकवाडला देता आलं नाही १ कोटींसाठी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर

ऋता अनेक चाहत्यांची क्रश आहे. कित्येक तरुण तिच्या मागे वेडे आहेत. मात्र ऋताने नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये ती दिग्दर्शक आणि निर्माता प्रतिक शाह सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं कबुल केलं. हृताने तिच्या प्रेमाची कबुली दिली. मात्र ऋताच्या या कबुलीने अनेक तरुणाची अवस्था वाईट झाली आहे. चाहत्यांची मनं दुखावल्याने तशा आशयाचा एक मीमदेखील सोशल मीडियावर वायरल झाला आहे. या मीममध्ये अरुंधती आणि अभिषेक दिसत आहे. अभिषेक वेड लागल्याप्रमाणे वागत आहे तर अरुंधती त्याला समजावत आहे. या मीमनुसार ऋताच्या चाहत्यांची देखील अशीच काहीशी अवस्था झाली आहे.


या मीमला सोशल मीडियावर भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अनेक जण या मीमप्रमाणे आपल्या भावनादेखील दुखावल्या गेल्याचं कबुल करत आहेत. तर काही जण प्रतिक्रिया देताना रडण्याचे इमोजी पोस्ट करत आहेत. एकंदरीतच ऋताच्या प्रतिकसोबत रिलेशनमध्ये असण्याचा अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे हे नक्की.

झी मराठी आणि स्टार प्रवाहवरील मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप



Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here