हायलाइट्स:
- पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत चौकाचं नामकरण
- कार्यक्रम सुरू असताना पावसाची हजेरी
- चंद्रकांत पाटलांनी भरपावसातही सुरू ठेवलं भाषण
पुणे शहरातील नवी पेठ येथील सेनादत्त पोलीस चौकीच्या समोरील चौकाचं नामकरण आज सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय सुरेश आप्पा माळवदकर असं करण्यात आलं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत फलक अनावरण झालं.
फलक अनावरणानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांचं भाषण सुरू असतानाच पाऊस कोसळू लागला, मात्र पाटील यांनी न थांबता आपलं संबोधन सुरूच ठेवलं.
दरम्यान, या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश सचिव आणि पुणे शहर प्रभारी धीरज घाटे, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, नगरसेविका स्मिता वस्ते, नगरसेवक राघुनाथ गौडा, ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे उपस्थित होते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times