हायलाइट्स:
- तीक्ष्ण हत्याराने वार करून खून
- गुन्हेगाराच्या हत्येनं शहरात खळबळ
- पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील म्हसरूळ-आडगाव लिंकरोडवरील रोहिणी हॉटेलसमोरील मोकळ्या भूखंडाच्या भागात हा खून झाला. प्रवीणची काही दिवसांपूर्वी जामिनावर मुक्तता झाली होती. तो शहर पोलीस आयुक्तालयातील कर्मचाऱ्याचा मुलगा होता.
खून करणारे संशयित अज्ञात असून, ते तीन ते चार जण असण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, या हत्या प्रकरणाविषयी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलीस आयुक्त मधुकर गावित, म्हसरूळ पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत कुमार सुर्यवंशी आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times