हायलाइट्स:
- हल्लेखोर दुचाकीवरून घटनास्थळी दाखल झाले होते
- ग्रेनेडे हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार
- सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्यानं पोलिसांचा तपास सुरू
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्मी गेटजवळ दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी आर्मी कॅम्पच्या गेटजवळ ग्रेनेड फेकला. यावेळी गेटजवळूनच एक वरात जात होती.
स्फोटानंतर तातडीनं पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू केलाय. दरम्यान, पठाणकोटच्या सर्व पोलीस चौक्यांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आलेत.
पठाणकोटचे एसएसपी सुरेंद्र लांबा यांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिकदृष्ट्या ग्रेनेडच्या सहाय्यानं हा स्फोट घडवून आणण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.
या स्फोटात कुणीही जखमी झाल्याची अद्याप माहिती नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून ग्रेनेडचे काही भाग जप्त केले आहेत.
२०१६ मध्येही पठाणकोटमध्ये हल्ला
पठाणकोट हे सुरक्षेच्यादृष्टीने भारताच्या सर्वात महत्त्वाच्या ठिकाणांपैंकी एक आहे. या भागात हवाईदलाचं स्टेशन, सेनेचा दारुगोळा डेपो आणि दोन आर्मर्ड ब्रिगेड आणि आर्मर्ड युनिट्स आहेत. जानेवारी २०१६ मध्येही दहशतवाद्यांनी वायुसेनेच्या स्टेशनवर हल्ला घडवून आणला होता. या हल्ल्यात आठ जवान शहीद झाले होते. तर जवानांनी दिलेल्या प्रत्यूत्तरात पाच दहशतवादी ठार झाले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times