अहमदनगर : पाथर्डीत रंगलेल्या उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नगरचा सुदर्शन कोतकर याने विजेतेपद पटकाविले. त्याने नाशिकच्या बाळू बोडखे याच्यावर मात केली. लाल मातीच्या आखाड्यात झालेली अंतिम लढत तब्बल पाऊण तास रंगली होती. अखेर कोतकर याने घुटना डावावर बोडखे याला चितपट केले. कोतकर याचे वजन १२४ किलो तर बोडखे याचे वजन ८४ किलो असल्याने ही लढत एकतर्फी होईल असे वाटत होते, मात्र कोतकर याला बोडखे याने शेवटच्या क्षणापर्यंत झुंजवले. शेवटी कोतकर याने चपळाईने टाकलेला डाव सहजासहजी लक्षात न आल्याने चित्रिकरण पाहून पंचानी निर्णय दिला. (Maharashtra Kesari Sudarshan Kotkar जींकले उत्तर महाराष्ट्र केसरी पुरस्कार)

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा तालीम संघ, संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे व केदारेश्‍वर सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने एस.एम. निर्‍हाळी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात ही कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सर्व कुस्त्या मॅटवर घेण्यात आल्या. अंतिम कुस्ती लाल मातीत निकाली लावण्यात आली होती. केदारेश्वरचे अध्यक्ष प्रताप ढाकणे व तिसगावचे सरपंच काशिनाथ पाटील लवांडे, शिवशंकर राजळे यांच्या हस्ते या कुस्तीला सुरवात करण्यात आली.

Mumbai Weather : मुंबईकरांनो कसं आहे आजचं हवामान? हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यामुळे नागरिक हैराण
कोतकर याला चांदीची गदा व ५१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. तृतीय क्रमांक नगर येथील अनिल ब्राम्हणे याने पटकावला. या शिवाय ४८ किलो वजनी गटात संकेत सतरकर (नगर) ,५८ किलो गट पवन ढोणर (नाशिक) ,६५ किलो गट सुजय तनपुरे (नगर),७४ किलो गट महेश फुलमाळी (नगर), ८४ किलो गट ऋषिकेश लांडे (नगर) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. अन्य विविध वजनी गटात नगर जिल्ह्यातील मल्लांचे वर्चस्व राहिले.

पंच म्हणून हरियाणा येथील सनी चौधरी, विशाल जाधव,कैवल्य बलकवडे यांनी काम पहिले. पारितोषिक वितरण प्रताप ढाकणे, वैभव लांडगे, काशिनाथ पाटील लवांडे, रफिक शेख, गहिनीनाथ शिरसाठ, डॉ. दीपक देशमुख, सिद्धेश ढाकणे, राजेंद्र शिरसाठ, प्रा.अजय शिरसाठ यांच्या उपस्थितीत झाले. (Maharashtra Kesari Sudarshan Kotkar won the North Maharashtra Kesari Award)

एकवीरा देवीच्या दर्शनावरून परतताना इको कारचा भयंकर अपघात, चालकासह ३ ठार, ९ जखमी

(महाराष्ट्र केसरी सुदर्शन कोतकर यांना उत्तर महाराष्ट्र केसरी पुरस्कार)

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here