अभिनेते शिव ठाकरे यांचा कार अपघात : बिग बॉस मराठी 2 चा विजेता शिव ठाकरे याच्या कारचा भीषण अपघात झाला असून त्याला मागून येणाऱ्या भरधाव वाहनानं धडक दिली. यामध्ये शिव ठाकरेला दुखापत झाली आहे. शिव ठाकरे, त्यांचे जावई, बहीण आणि भाचा हे कारने शनिवारी सकाळी अमरावती वरुन परतवाडा येथे कामानिमित्त निघाले होते. त्यावेळी हा अपघात झाला. सुदैवानं यामध्ये कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.

बिग बॉस फेम शिव ठाकरे आपल्या कुटुंबीयांसह अमरावतीवरुन प्रवास करत होता. यावेळी वळगाव भागात त्याच्या गाडीला एका टेम्पो ट्रॅव्हलरने मागून धडक दिली. या अपघातात शिव ठाकरेसह त्याचे कुटुंबीय थोडक्यात बचावले असून शिवच्या चेहऱ्याला दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. आता त्यांची प्रकृती ठिक असून, तो अमरावती येथे घरी विश्रांती घेत आहेत. शिव ठाकरे, त्यांचे जावई, बहीण आणि भाचा हे कारने शनिवारी सकाळी अमरावती वरुन परतवाडा येथे कामानिमित्त निघाले होते. त्यावेळी भरधाव टेम्पोनं त्यांच्या गाडीला मागून धडक दिली आणि अपघात झाला.

दैव बलवत्तर म्हणून... 'बिग बॉस मराठी 2' विजेता शिव ठाकरेच्या गाडीला भीषण अपघात

परतवाडा मार्गावरच असलेल्या वायगाव येथील गणपतीचे दर्शन घेऊन शिव त्यांचा नातेवाइकांसह पुढील प्रवासाला निघाले होते. दरम्यान, वायगाव फाटा ते आष्टी दरम्यान मागून आलेल्या एका मिनी ट्रॅव्हल्सने शिव ठाकरे यांच्या कारला मागून जोरदार धडक दिली. ही धडक बसताच शिव ठाकरे यांची कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात 300 ते 400 फूट गेली होती. या अपघातात शिव ठाकरेच्या बहिणीचे पती आणि बहीण यांनासुद्धा किरकोळ दुखापत झाली आहे. याचवेळी शिवच्या डोळ्याच्या वरील बाजूला गंभीर दुखापत झाली असून, त्या ठिकाणी टाके घालण्यात आले आहे. आता शिव ठाकरे हे घरी असून त्यांची प्रकृती चांगली आहे.

शिव ठाकरे हे मुंबईवरून तीन दिवस सुट्टीच्या काळात अमरावतीला आले होते. शिव यांचे सध्या मुंबईत शुटींग सुरु असून, ते तीन दिवसांसाठी अमरावतीत घरी आले होते. याच सुटीच्या काळात अमरावती ते परतवाडा येथे जात असताना हा अपघात घडला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here