म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने एका नायजेरियन नागरिकाला अटक केली असून त्याच्याकडून पाच कोटी रुपयांचे एमडी आणि कोकेन ही ड्रग्ज हस्तगत केली आहेत. या नायजेरियन तरुणाने दिल्ली येथून ही ड्रग्ज आणली होती.

अमली पदार्थविरोधी पथकासह गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकांकडून अमली पदार्थाची तस्करी, विक्री आणि सेवन करणाऱ्यांवर बारीक नजर ठेवली जाते. एक नायजेरियन नागरिक मुंबईत ड्रग्जची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट ४च्या पथकाला मिळाली.

प्रभारी पोलिस निरीक्षक इंद्रजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने रविवारी आणिक बस डेपोसमोर सापळा लावला. तेथे एक संशयित त्यांना फिरत असल्याचे दिसले. या तरुणाकडील पर्सची तपासणी केली असता पर्समधील अस्तराच्या आत एमडी ड्रग्ज आणि कोकेन लपविण्यात आले होते. या ड्रग्जची किंमत ५ कोटींपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वहिनी आणि दोन मुलं छतावर होती, दीराने उचलले भयानक पाऊल; २४ तासांत घटनेचा छडा

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक इंद्रजीत मोरे आणि बिराजदार यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून नवी मुंबईतील खारघर येथून अँथोनी याला ताब्यात घेतले. त्यांनी झडती घेतली असता, पोलिसांना तिथे काहीच आढळून आले नाही. त्यानंतर त्यांनी त्याच्या हातात असलेली पर्स बघितली. पर्सच्या आतमध्ये अस्तरा लावण्यात आला होता. त्यात एमडी आणि ११८ ग्रॅम कोकेन आणि दहा हजारांची रोकड सापडली, अशी माहिती डीसीपी (क्राइम) प्रकाश जाधव यांनी दिली.

धक्कादायक! मजुरीचे पैसे मागितले म्हणून मजुरासोबत घडलं भयानक, थरकाप उडवणारी घटना!

अँथोनी याच्याविरोधात एनडीपीस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याला कोर्टात हजर केले असता, २६ नोव्हेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्या सूत्रांच्या हवाल्याने माहिती दिली की, त्याने दिल्लीतून ड्रग्ज खरेदी केले होते आणि ते मुंबईत विकणार होता. तसेच ठाणे आणि नवी मुंबईतही त्याची विक्री करण्यात येणार होती. पोलीस त्याच्या कॉल डिटेल्सची तपासणी करणार असून, हे ड्रग्ज नेमके कुठून आणले, याचा शोध घेतला जात आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here