dirty quotes to send to your crush: ‘होण्याऱ्या नवऱ्याला अश्लील मेसेज पाठवणं हा गुन्हा नाही’ – mumbai session court says dirty message to fiance is not an insult
मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी मुंबईतील सत्र न्यायालयाने एका व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली आहे. लग्नाआधी होणाऱ्या पत्नीला अश्लील मेसेज पाठवणे हा कोणाच्याही प्रतिष्ठेचा अपमान नाही, असे म्हणत न्यायालयाने त्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली. तसेच असे संदेश एकमेकांच्या भावना समजून घेणारे असू शकतात, असेही न्यायालयाने म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३६ वर्षीय तरुणावर ११ वर्षांपूर्वी त्याच्या मंगेतरने लग्नाच्या बहाण्याने बलात्काराचा आरोप केला होता. याच प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले आहे की, जर एखाद्याला कोणी पसंत करत नसेल, तर त्याचे दुःख समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचवणे हा त्याचा अधिकार आहे आणि दुसऱ्याने अशी चूक टाळली पाहिजे, असं न्यायालयाने म्हटलं आहे. कुंडलिक खांडे यांना शिवसेना जिल्हा प्रमुख पदावरून हटवले, बीडमध्ये राजकीय खळबळ न्यायालयाने पुढे म्हटलं की, या संदेशांचा उद्देश होणाऱ्या पार्टनरसमोर आपल्या इच्छा व्यक्त करणे, लैंगिक भावना जागृत करणे इत्यादी असू शकते, हे संदेश पार्टनरला आनंदी देखील करू शकतात. पण अशा एसएमएसमुळे लग्न होणार्या महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असे म्हणता येणार नाही.
खरंतर, महिलेने २०१० मध्ये त्या पुरुषाविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. २००७ मध्ये एका मॅट्रिमोनिअल साइटवर दोघांची भेट झाली होती. मात्र, तरुणाच्या आईचा या लग्नाला विरोध होता. त्यामुळे तरुणाने २०१० मध्ये तरुणीशी संबंध तोडले. त्यावर कोर्टाने म्हटले की, लग्नाचे आश्वासन मागे घेणे याला फसवणूक किंवा बलात्कार म्हणता येणार नाही.