हायलाइट्स:

  • बिग बॉस मराठी ३ मधून स्नेहा वाघचे नॉमिनेशन
  • बिग बॉसच्या घरात उरले नऊ सदस्य
  • स्नेहाच्या जाण्याला ही व्यक्ती जबाबदार असल्याचा विशालचा आरोप

मुंबई : बिग बॉस मराठी ३ मध्ये आता टॉप नाईन स्पर्धक राहिले आहेत. रविवारी प्रसारित झालेल्या भागामधून स्पर्धक स्नेहा वाघ घराबाहेर पडली. स्नेहा घराबाहेर पडल्यामुळे सोशल मीडियावरील युझर्सनी समाधान व्यक्त केलं. मात्र, तिच्या घराबाहेर पडण्याला जय दुधाणेच जबाबदार असल्याचं मत स्पर्धक विशाल निकम याने व्यक्त केलं.

गेल्या आठवड्यात झालेल्या टास्कमधून सोनाली पाटील, उत्कर्ष शिंदे, मीरा जगन्नाथ, गायत्री दातार, संतोष चौधरी, स्नेहा वाघ नॉमिनेट झाले होते. मात्र शनिवारच्या भागामध्ये सोनाली आणि गायत्री सेफ असल्याचं महेश मांजरेकर यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे रविवारी कुणाचं नॉमिनेश होणार याची उत्सुकता होती. अखेर रविवारी मीरा आणि स्नेहा या दोघीजणी राहिल्या. यातील स्नेहा घराबाहेर जात असल्याचे मांजरेकरांनी जाहीर केलं. स्नेहाच्या जाण्यामुळे सर्वात जास्त वाईट दादूस यांना वाटलं होतं.

स्नेहा वाघ

‘त्याच्या’चमुळे स्नेहा घराबाहेर गेली

बिग बॉस मराठी ३ च्या सोमवारी प्रसारित होणाऱ्या भागामध्ये स्नेहा वाघ घराबाहेर गेल्यावर घरातील स्पर्धकां आपापसांत झालेली चर्चा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. विशाल निकम आणि विकास पाटील यांच्यात ही चर्चा झाली. त्यावेळी विशालने स्नेहाच्या जाण्याला थेट जय जबाबदार असल्याचं मत व्यक्त केलं.

यावेळी विशाल म्हणाला, ‘मला असं वाटलं होतं जयला फार वाईट वाटेल. त्यांच्यातला बॉण्ड पाहून मला तसं वाटलं. म्हणजे ते स्नेहाकडून दिसतं होतं खूप. माझ्याकडे येऊन जयविषयी स्नेहा कितीतरी वेळा बोलली होती. त्यातही नॉमिनेशन झाल्यानंतर ती जास्त बोलली. त्याला किती वाईट वाटेल की त्याच्या कॅप्टन्सीसाठी मी नॉमिनेट झाले आणि त्याच्यामुळे घरी जाणार… समजा मी गेलेच तर. त्याची अवस्था कशी होईल याचाच ती खूप जास्त विचार करत होती. जाताना पण तिने मला खुणावलं त्याला सांभाळ म्हणून..’

विशाल आणि  विकास

त्यावर विकास म्हणाला की, ‘नाही ही गोष्ट माझ्या लक्षात नव्हती की, त्याच्यासाठी ती नॉमिनेट झाली होती. पण हे आता खरं आहे की कुठेतरी तो कारणीभूत ठरला स्नेहा बाहेर जाण्यासाठी…’ दरम्यान, आज प्रसारित होणा-या बिग बॉस मराठी ३ च्या घरात बाकीचे सदस्य स्नेहाच्या जाण्यावरून काय काय मते व्यक्त करतात ते समजणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here