हायलाइट्स:

  • मुंबईत धक्कादायक प्रकार
  • निवृत्त मुख्याध्यापकाला व्हिडिओ कॉलद्वारे केले ब्लॅकमेल
  • महिलेने नग्नावस्थेत व्हिडिओ कॉल करून निवृत्त मुख्याध्यापकाला धमकावले
  • पीडित व्यक्तीने पोलिसांत दाखल केली तक्रार

मुंबई: दक्षिण मुंबईतील एका शाळेतील निवृत्त मुख्याध्यापकांना एका महिलेने नग्नावस्थेत व्हिडिओ कॉल करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून खंडणीस्वरूपात पैसे उकळण्याचेही प्रयत्न केले. आरोपी महिलेने त्यांना सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करणार असल्याचे सांगून त्यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करण्याचीही धमकी दिली.

रिपोर्टनुसार, ही महिला निवृत्त मुख्याध्यापकावर ‘ऑनलाइन पाळत’ ठेवत होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यानंतर तिने त्यांचा संपर्क क्रमांक मागितला. तो मिळवल्यानंतर तिने त्यांना नग्नावस्थेत व्हिडिओ कॉल केला. ते व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर, त्यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार करण्याची धमकी दिली.

ठाणे: महिला रेल्वे पोलिसाची भन्नाट कामगिरी; रेल्वे ट्रॅकवर उडी घेऊन चोरट्याचा ५०० मीटरपर्यंत पाठलाग केला अन्…
मुंबईत पुन्हा ड्रग्जविरोधात धडक कारवाई; ५ कोटींचे ड्रग्ज पकडले

खार पश्चिमेकडे राहणाऱ्या निवृत्त मुख्याध्यापकांनी या प्रकारानंतर खार पोलीस ठाण्यात १७ नोव्हेंबरला तक्रार दाखल केली. मुख्याध्यापक हे २००२ मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. ते निवृत्त झाल्यानंतरही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहेत. कलेशी संबंधित पोस्ट ते सोशल मीडियावर टाकत असतात. १० नोव्हेंबरला एका महिलेने त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. मात्र, ती अनोळखी असल्याने त्यांनी अॅक्सेप्ट केली नाही. तक्रारीत नमूद केल्यानुसार, महिलेने त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मेसेज पाठवला. ब्युटी पार्लरमध्ये काम करत असल्याचे सांगून तुमच्यासोबत बोलायचे असल्याची म्हणाली. पण त्यांनी फ्रेंड रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केली नाही. त्यानंतर तिने तिचा संपर्क क्रमांक शेअर केला आणि मला तातडीने महत्वाचे बोलायचे आहे, असे ती म्हणाली. त्यानंतर काही महत्वाचे असेल असे वाटल्यानंतर त्यांनीही संपर्क क्रमांक दिला.दुसऱ्या दिवशी तिने मेसेज पाठवला. त्यावर त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. १२ तारखेला तिने थेट व्हिडिओ कॉल केला आणि त्यावेळी ती नग्नावस्थेत होती. त्यांनी तात्काळ कॉल डिस्कनेक्ट केला. दोन दिवसांनी तिने मोबाइलमध्ये २४९ रुपयांचा रिचार्ज करण्यास सांगितले. तिने दोन-तीन वेळा कॉल केला. मात्र, त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर तिने व्हिडिओ रेकॉर्ड केले असून, त्यांच्या पत्नीला आणि मुलांना पाठवण्याची धमकी दिली. तसेच बलात्काराची तक्रार दाखल करणार असल्याचे म्हणाली. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून सायबर सेलच्या मदतीने तपास सुरू केला आहे.

वहिनी आणि दोन मुलं छतावर होती, दीराने उचलले भयानक पाऊल; २४ तासांत घटनेचा छडा

साबरमती रिव्हर फ्रंट येथे चौघे मोबाइलवर गेम खेळत होते, इतक्यात सहा जण आले अन्…

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here