हायलाइट्स:

  • शौर्य पुरस्कार २०२१ प्रदान सोहळा
  • राष्ट्रपती भवनात पार पडला सोहळा
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंहदेखील उपस्थित


नवी दिल्ली : बालाकोट एअरस्ट्राईकच्या दुसऱ्याच दिवशी भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या एफ – १६ लढावू विमानाला पाडणाऱ्या ‘विंग कमांडर’पदी राहिलेल्या अभिनंदन वर्धमान यांना आज ‘वीर चक्र’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज दिल्लीत सद्य ‘ग्रुप कॅप्टन’ अभिनंदन यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील सहभाग घेतला.

अभिनंदन वर्धमान यांनी २७ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानी वायुसेनेचं F 16 लढावू विमान हवाई युद्धात पाडताना दाखवलेल्या पराक्रमासाठी त्यांना ‘वीर चक्र’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय.


अभिनंदन यांच्या नव्या लूकची चर्चा

या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं अभिनंदन वर्धमान यांचा नवा लूकही नागरिकांना पाहायला मिळाला. एअरस्ट्राईकनंतर ‘रिअल हिरो’ ठरलेल्या अभिनंदन यांचा तेव्हाचा लांब आणि विशिष्ट आकार दिलेल्या मिशीसहीतला लूक अनेकांना आवडला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी आपला लूक बदललेला दिसला.

अभिनंदन यांच्या मिशीची इतकी चर्चा झाली होती की जून २०१९ मध्ये लोकसभेत खासदार अधीर रंजन चौधरी यांनी त्यांच्या मिशीला ‘राष्ट्रीय मिशी’ घोषित करण्याची मागणी केली होती.

अभिनंदन वर्धमान

ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान

पठाणकोटमध्ये आर्मी कॅम्पच्या गेटजवळ ग्रेनेड स्फोटjitendra singh : ”POK’ परत मिळवणं हा पुढील अजेंडा’, केंद्रीय मंत्र्यांचे मोठे विधान
अभिनंदन यांच्या पराक्रमाची जगभरात चर्चा

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्त्यूतरादाखल भारतीय वायुसेनेनं २६-२७ फेब्रुवारी रोजी रात्री पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये एअरस्ट्राईक केली होती. या हल्ल्यात पाकिस्तानच्या जमिनीवर उपस्थित असलेले जवळपास ३०० दहशवादी ठार झाल्याचा दावा भारतानं केला होता. त्याच्या पुढच्याच दिवशी २७ फेब्रुवरी २०१९ रोजी पाकिस्तानच्या वायुसेनेनं भारताच्या सीमेत घुसण्याचं दु:स्साहस केलं. परंतु, भारतीय वायुसेनेनं त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी दोन्ही देशांदरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.
त्यावेळी, ‘विंग कमांडर’पदी तैनात असणाऱ्या अभिनंदन यांनी ‘मिग २१’ या लढावू विमानानं पाकिस्तानचं ‘एफ-१६’ विमान हवेतच हाणून पाडलं होतं. मात्र, या दरम्यान त्यांचं विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळलं. पाकिस्तानी लष्करानं अभिनंदन यांना ताब्यात घेतलं. ते तीन दिवस पाकिस्तानच्या ताब्यात होते. आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्ताननं अभिनंदन यांना योग्य त्या सन्मानासहीत भारताच्या स्वाधीन केलं होतं.

अमेरिका निर्मित ‘एफ १६’ हे अत्याधुनिक लढावू विमान मानलं जातं, तर ‘मिग २१’ हे रशिया निर्मित ६० वर्षांपूर्वीचं विमान होतं. त्यामुळे जगभरात अभिनंदन यांच्या पराक्रमाची चर्चा झाली होती.

शौर्य पुरस्कार 2021 : वीरांचा सन्मान

राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या शौर्य पुरस्कार २०२१ सोहळ्यात भारतीय सेनेच्या अनेक वीरांचं कौतुक करम्यात आलं. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी शहीद प्रकाश जाधव यांना मरणोपरांत कीर्ती चक्रानं सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हा पुरस्कार शहिदाच्या पत्नी आणि मातेकडे सोपवला.

नायब सुभेदार सोमबीर यांना मरणोपरांत शौर्य चक्रानं सन्मानित करण्यात आलं. तसचं पाच दशतवाद्यांना टिपणाऱ्या शहीद मेजर विभूती शंकर धौंडियाल यांना मरणोपरांत शौर्य चक्रानं सन्मानित करण्यात आलं. या सोहळ्यात शहिदाची पत्नी आणि लेफ्टनंट नितिका कौल तसंच त्यांच्या आईनं पुरस्कार स्वीकारला.

कृषी कायदे माघारी : आता, CAA – NRC विरोधी आंदोलन पुन्हा उभं राहण्याचे संकेत
IANS-C Voter Snap Opinion Poll : कृषी कायदे रद्द केल्याने भाजपला फायदा होणार का? काय सांगतो सी-वोटरचा सर्वे? वाचा…

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here