हिंगोली : येलकी येथील सशस्त्र सीमा बलाच्या कॅम्पमधील कार्यरत असलेल्या जवानाचा छातीत गोळी लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्या फोर्सच्या डॉक्टरला आणण्यासाठी नांदेडला जात असताना खड्ड्यांमध्ये गाडी आदळल्याने रायफल मधून गोळी झाडल्या गेली. ती छातीत लागल्याने जवानाचा मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातील येलकी येथील सशस्त्र सीमा बलाच्या कॅम्पमध्ये कार्यरत असलेले जवान कॉन्स्टेबल पप्पाला भानूप्रसाद ( वय ३५ वर्षे , राहणार आंध्र प्रदेश ) हे कर्तव्यावर होते. पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास ते डिपारमेंटच्या गाडीमध्ये हैदराबाद वरून नांदेडला आलेल्या डॉक्टरला घेण्यासाठी ते नांदेड कडे निघाले होते. एसटी संप: शरद पवारांसोबत चार तास चर्चा केल्यानंतर अनिल परब यांचं मोठं विधान चालक आणि जवान जात असताना डोंगरकडा ते नांदेड या रस्त्यावर डोंगरकडा पासून तीन किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. रस्त्याचे काम सुरू असल्याने मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात गाडी आदळल्याने ‘ इंसास रायफल ‘ मधून गोळी सुटली. ती थेट जवानाच्या छातीत घुसली. त्यातच जवानाचा मृत्यू झाला आहे.त्यास नांदेडच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. घटनास्थळी ठाणेदार पंढरीनाथ बोधनापोड , पोलीस उपनिरीक्षक बालाजी पुंड पोहोचले आहेत.
सशस्त्र सीमा बलाचे कमांडंट तिवारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतू संपर्क झाला नाही. नांदेड हिंगोली रस्त्यावरील खड्ड्यांमुळे हा अपघात घडला असल्याची चर्चा सुरू असून खड्ड्यांमुळे जवांणाचा जीव गेला असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या घटनेमुळे सद्धा हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवसेनेला धक्का देण्याची तयारी करणाऱ्या भाजपलाच कल्याण-डोंबिवलीत खिंडार
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times