संभाजी राजे महाराष्ट्रातील गड- किल्ल्यांवर अनेकदा भेटी देतात. गड- किल्ल्यांच्या कामाची पाहणी स्वतःहून करतात. गड किल्ल्यात रमणारा माणूस असंही त्यांचं कौतुक कार्यकर्ते करतात.

भरपावसात विश्रामगड किल्ला सर

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाचं सावट आहे. नाशिकमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. सध्या संभाजी राजे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी भरपावसात विश्रामगड किल्ला सर केला आहे.

शिवपदस्पर्श दिवस

निमित्त होते शिवपदस्पर्श दिनाचे. छत्रपती शिवरायांनी या दिवशी म्हणजेच २२ नोव्हेंबर १६७९ रोजी विश्रामगडावर विश्रांती घेतली होती. या इतिहासाला उजाळा देत याची आठवण म्हणून संभाजीराजेंनी स्वतः भर पावसात किल्ला सर करीत किल्ल्यावर शिवपदस्पर्श दिन साजरा केला.

जय शिवाजी, जय भवानीचा जयघोष

यावेळी विश्रामगडावर उपस्थित ‘शिवभक्तांनी जय शिवाजी,जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणांनी विश्रामगड दणाणून सोडला होता.

शिवरायांनी घेतली होती विश्रांती

सुरतेच्या लुटेहून येतांना शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर विश्रांती केल्याचा इतिहास सांगितला जातो. त्यामुळे संभाजी राजेंच्या उपस्थितीत आज या किल्ल्यावर शिवपदस्पर्श दिन साजरा होत आहे

गडाचे नामांतर झाले

२२ नोव्हेंबर १६७९ या दिवशी छत्रपती शिवाजीमहाराजांनी विश्रामगडावर आले होते. राजांनी १५ दिवस या गडावर विश्रांती घेतली. यामुळे महाराजांनी गडाचे नामांतर करत ते विश्रामगड ठेवले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here