हायलाइट्स:
- कॉलेजच्या मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार
- नराधम पोलिसाला अखेर अटक
- धक्कादायक घटनेनं इस्मापुरात खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार, इस्लामपूर पोलीस ठाण्यात नेमुणकीस असलेला पोलीस कर्मचारी हणमंत देवकर याने २७ ऑक्टोबरला पहाटे तीनच्या सुमारास शहरात रात्रगस्त घालताना एका तरुणास अडवले. तो मुलगा त्याच्या मैत्रिणीला भेटून होस्टेलकडे निघाला होता. त्यावेळी देवकर याने मुलाकडून त्याचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर २९ ऑक्टोबर रोजी मुलाला फोन करून देवकर याने कॉलेजच्या गेटवर बोलावून घेतलं.
‘तुझं प्रेम प्रकरण कुटुंबातील व्यक्तींना सांगतो,’ असं धमकावून त्याने मुलाकडे खंडणीची मागणी केली. घाबरलेल्या मुलाने मित्राकडून चार हजार रुपये उसने घेऊन पोलीस कॉन्स्टेबल देवकर याला दिले. त्यानंतर देवकर याने मुलाकडे त्याच्या मैत्रिणीचा मोबाईल नंबर मागून तिच्यासोबत सेक्स करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र मुलाने त्याला नकार दिला.
मैत्रिणीसोबत नाही तर, आता तुझ्यासोबत सेक्स करणार, असं धमकावून तो मुलाला त्याच्या रूमवर घेऊन गेला. त्या ठिकाणी मुलासोबत अनैसर्गिक सेक्स करून त्याचे मोबाईलवर चित्रीकरण केले. त्यानंतर मोबाईलवरील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन, पोलीस कॉन्स्टेबल देवकर याने पीडित मुलावर पुन्हा बलात्काराचा प्रयत्न केला.
दरम्यान, या प्रकारास कंटाळून अखेर पीडित मुलाने इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार पोलिसांनी कॉन्स्टेबल हनुमंत देवकर याला अटक केली असून या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण हे करत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Read reviews and was a little hesitant since I had already inputted my order. otherwise but thank god, I had no issues. significantly received item in a timely matter, they are in new condition. you decide so happy I made the purchase. Will be definitely be purchasing again.
cheap real jordans https://www.realjordansretro.com/