हायलाइट्स:

  • गरोदर असताना १० लाख रुपयांसाठी घराबाहेर काढल्याचा पत्नीचा आरोप
  • पत्नीने पतीविरोधात केली हुंडा मागितल्याची तक्रार
  • भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष रंजीत पटेल यांच्यावर आरोप
  • पत्नीने केलेले आरोप रंजीत पटेल यांनी फेटाळले

जबलपूर: मध्य प्रदेशातील जबलपूर येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रंजीत पटेल यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीने हुंड्यासाठी छळ आणि मारहाण करून घरातून बाहेर काढल्याचे आरोप केले आहेत. पीडित महिला ही गरोदर आहे. या प्रकरणी तिने महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पत्नीने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, सन २०१९ मध्ये रंजीत पटेल यांच्याशी विवाह झाला होता. त्याचवेळी तिच्या कुटुंबीयांनी जवळपास ४० लाख रुपये किंमतीचे साहित्य आणि १५ लाख रुपये रोकड हुंडा म्हणून दिली होती. मात्र, सासरची मंडळी तरीही समाधानी नव्हती. यावरून तिचा वारंवार छळ केला जात होता, असेही तिने तक्रारीत म्हटले आहे.

पुणे: अल्पवयीन मुलावर मित्राने केला अनैसर्गिक अत्याचार

पीडित महिलेने आणखी एक गंभीर आरोप केला आहे. सासरची मंडळी आणखी दहा लाख रुपयांची मागणी करत आहे. लग्नानंतर काही दिवसांतच तिचा यावरून छळ केला जात आहे, असा तिचा आरोप आहे. पीडित महिलेने पती आणि सासरच्या मंडळींवर मारहाण आणि मोलकरणीसारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोपही केला आहे. इतकेच नाही तर गरोदर असताना घरातून बाहेर काढले. त्यानंतर तिला पुन्हा सासरी येऊ दिले नाही, असाही आरोप तक्रारीत केला आहे. महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी रंजीत पटेल आणि त्यांच्या पत्नीला कुटुंब समुपदेशन केंद्रात बोलावण्यात आले. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर त्याला समज दिली आहे. एका आठवड्यानंतर त्याच्याकडे उत्तर मागितले आहे.

मुंबई: महिलेने नग्नावस्थेत निवृत्त मुख्याध्यापकांना केला व्हिडिओ कॉल, त्यानंतर…

हुंडा मागितल्याचा आरोप पटेल यांनी फेटाळला

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, जर यानंतरही दोन्ही पक्षकारांमध्ये सहमती झाली नाही तर, त्यानंतर पोलीस संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. दुसरीकडे, रंजीत पटेल यांनी पत्नीने लावलेले आरोप फेटाळून लावले आहेत. १८ महिन्यांपासून पत्नी वेगळी राहते. दोन महिन्यांपूर्वी तिने घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर ही माझ्याविरोधात खोटी तक्रार केली आहे. हुंडा मागितल्याचा आरोप खोटा आहे, असे पटेल यांचे म्हणणे आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here