हायलाइट्स:

  • हिंसाचार प्रकरणावरून महाराष्ट्रात सुरू झालेला राजकीय गदारोळ कायम
  • धुळ्यात भाजपकडून आंदोलन
  • ठाकरे सरकारवर केला गंभीर आरोप

धुळे : त्रिपुरा हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुरू झालेला राजकीय गदारोळ अजूनही सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील दंगलीसह हिंसाचारानंतर एकतर्फी कारवाई करण्यात आली आहे, असा आरोप करत आज धुळ्यात (धुळे बातम्या) भाजपकडून आंदोलन करण्यात आलं आहे.

‘त्रिपुरामध्ये न घडलेल्या घटनेची अफवा पसरवून राज्यातील मालेगाव, अमरावती व नांदेड येथे मोर्चे काढून काही संघटनांनी व समाजकंटकांनी दंगली घडवल्या. या दंगलींना महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार जबाबदार असून हिंसाचार प्रकरणी एकतर्फी कारवाई सुरू आहे,’ असं म्हणत भाजपने सोमवारी क्यूमाईन क्लब येथे एक दिवसाचं धरणे आंदोलन केलं.

Nawab Malik Vs Sameer Wankhede मोठी बातमी: वानखेडे यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा नाहीच; मलिक यांना दिले हे निर्देश

यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर प्रदीप कर्पे, हिरामण गवळी, प्रदीप पानपाटील, यशवंत येवलेकर, चंद्रकांत गुजराथी, ओमप्रकाश खंडेलवाल, अ‍ॅड.किशोर जाधव, भगवान गवळी, शितल नवले, सुनिल बैसाणे, राजु महाराज, महिला आघाडीच्या जयश्री अहिरराव, मायादेवी परदेशी, अलका अग्रवाल, सुनिता सोनार, वंदना विश्‍वकर्मा, कल्याणी अंपळकर, भारती माळी, सुरेखा उगले, सुमित माईनकर, सागर जोशीआदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

काय आहेत भाजपच्या मागण्या?

आंदोलनासंदर्भात भाजपने म्हटलं आहे की, ‘त्रिपुरात कुठलीही अनुचीत घटना घडलेली नसताना अन्य कुठल्यातरी मशिदीत नासधुस झाल्याची ध्वनी चित्रफीत प्रसारीत करून महाराष्ट्रातील मालेगाव, अमरावती व नांदेड येथे दंगली उसळल्या. यानंतर केवळ स्वसंरक्षणासाठी नागरिक व व्यापारी रस्त्यावर उतरले होते. अशावेळी पोलिसांनी त्यांच्यावर पक्षपाती पद्धतीने एकतर्फी कारवाई केली. त्यामुळे दंगल घडवणार्‍या सूत्रधारांना व त्यांच्या समर्थकांना अटक करावी. हिंसाचाराच्या घटनांची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी. रझा अकादमीवर बंदी घालावी. निष्पाप नागरिकांवरील कारवाई थांबवावी. त्याचप्रमाणे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर पूर्वग्रहदूषित पद्धतीने होणारी कारवाई थांबवून दाखल गुन्हे मागे घ्यावेत,’ अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, ‘महाविकास आघाडी सरकार एसटी बस कर्मचाऱ्यांचं आंदोलनही दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारने डिझेल आणि पेट्रोलचे दर कमी केल्यानंतर भाजपशासित राज्यांमध्ये कर कमी करण्यात आले. मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार पेट्रोल आणि डिझेलचे कर कमी करण्याऐवजी मद्यावरील कर कमी करत आहे,’ असा हल्लाबोल भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी यावेळी केला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here