भोपाळ: मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री यांनी कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर एकामागून एक ट्विट करत आपल्याच पक्षाच प्रश्न उपस्थित केले आहेत. घेण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना कठड्यात उभे केले. त्याचवेळी उमा भारती यांनी ट्विटमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुकही केले.

कृषी कायदे मागे घेतल्याने खूप दु:ख झाले आहे. चार दिवसांपासून गंगेच्या काठावर आहे. १९ नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींनी तिन्ही कायदे मागे घेण्याची घोषणा केली. तेव्हा त्यांचं भाषण ऐकून धक्का बसला, असं म्हणत उमा भारती यांनी तीन दिवसांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली.

उमा भारती यांनी पक्ष कार्यकर्त्यांवर कृषी कायद्यांबाबत प्रश्न उपस्थित केले. कृषी कायद्यांवरून विरोधकांच्या सततच्या अपप्रचाराला आपण तोंड देऊ शकलो नाही. त्यामुळेच पंतप्रधानांच्या भाषणाने खूप अस्वस्थ झाले होते, असे उमा भारती म्हणाल्या.

उमा भारती यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. कायदे मागे घेऊनही पंतप्रधानांनी आपला मोठेपणा दखावला. असा अद्वितीय नेता युगानुयुगो असू दे, यशस्वी होवो, हीच बाबा विश्वनाथ आणि माता गंगाकडे प्रार्थना करते, असे उमा भारतींनी ट्विटमध्ये म्हटलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here