हायलाइट्स:

  • एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून राणेंची सरकारवर बोचरी टीका
  • शरद पवारांवरही साधला निशाणा
  • केंद्र सरकारला हस्तक्षेप करण्याची केली विनंती

सिंधुदुर्ग :एसटी कर्मचारी संपाच्या प्रश्नावरून भाजप नेते आणि केंद्रीय नारायण राणे (नारायण राणे यांचे वक्तव्य) यांनी राज्यपालांकडे हा विषय द्या, आम्ही तोडगा काढू, असं म्हणत वेळ पडल्यास राज्याच्या परिवहन मंत्र्याशी बोलू अशी प्रतिक्रिया सिंधुदुर्गात दिली आहे. यावेळी राज्य सरकारवर टीका करत असताना राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका नारायण राणे यांनी केली. ‘एसटी कर्मचाऱ्यांबाबत अद्यापही तोडगा निघाला नाही, यालाच शरद पवार म्हणतात. शरद पवार तोडगा कधीच काढत नाहीत. खेळवत ठेवणं त्यांचं काम आहे. ज्यांनी सरकार बनवलं ते शरद पवार हे सरकारला आदेश देऊ शकत नाहीत का? कर्मचाऱ्यांना न्याय ताबडतोब द्या. निलंबित कर्मचाऱ्यांना कामावर घ्या, हे शरद पवारांनी बोललं पाहिजे, सरकारला सांगितलं पाहिजे. नुसतं अर्थमंत्र्यांना बाजूला बसवून काय फायदा?,’ असा सवालही नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.

Shiv Sena: शिवसेनेने घेतला मोठा निर्णय; ‘त्या’ दोन पदाधिकाऱ्यांना तडकाफडकी हटवले

‘महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत एसटीचा विषय येतो. एसटीचा संप गेले अनेक दिवस झालं सुरू आहे आणि जवळपास ४० एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. भयावह परिस्थिती एसटी कर्मचाऱ्यांच्या घरी आहे. असं असताना राज्य सरकार फक्त खेळवत ठेवत आहे, या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे,’ असा हल्लाबोलही राणे यांनी केला आहे.

‘केंद्र सरकारने निर्देश द्यावेत’

‘एसटी कर्मचाऱ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न गांभीर्याने घेतला जात नसल्याने केंद्र सरकारने सरळ महाराष्ट्र सरकारला निर्देश द्यावेत की प्रश्न ताबडतोब मिटवा, अन्यथा राज्यपालांकडे आम्ही हे अधिकार देऊ. जो मार्ग काढायचा आहे, त्याबद्दल मी स्वतः अमित शहांशी आणि पंतप्रधानांशी बोलेन आणि कर्मचाऱ्यांना वाचवावं एवढं मी सांगेन,’ असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here