पाटण तालुक्यातून गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांचा पराभव झाला असून सत्यजित पाटणकर हे विजयी झाले आहेत. जावली तालुक्यातून राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचा एका मतांनी पराभव झाला तर ज्ञानदेव रांजणे हे विजयी झाले आहेत. रांजणी हे राष्ट्रवादी पक्षातील बंडखोर उमेदवार आहेत. त्यांचा विजय झाल्यामुळे शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीचे कार्यालय फोडले.
कोरेगाव तालुक्यातून सुनील खत्री आणि शिवाजीराव महाडिक यांना समान मत पडल्यामुळे याठिकाणी टाय झाल्याचं पाहायला मिळतं. तर कराडमधून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी झाले असून उदयसिंह उंडाळकर यांचा पराभव झाला आहे. खटाव तालुक्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे ही विजयी झाले असून नंदकुमार मोरे यांचा पराभव झाला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times