हायलाइट्स:
- मध्य प्रदेशातील उद्योजकानं पत्नीला दिलं अनोखं गिफ्ट!
- बुरहानपूरमध्ये उभी राहिली ताजमहालची प्रतिकृती
- बेगम मुमताज यांचा मृत्यू बुरहानपूरमध्ये झाल्याचा इतिहासात उल्लेख
- घरात चार बेडरुम, एक किचन, ग्रंथालय आणि एक मेडिटेशन रुम
मुघल बादशहा शहाजहान यानं पत्नी मुमताजच्या प्रेमाखातर आग्र्यात उभारलेलं ‘ताजमहाल’ आज भारतातच नाही तर जगभरात प्रेमाचं प्रतिक बनलंय. याच ताजमहालची हुबेहुब प्रतिकृती सध्या मध्य प्रदेशातल्या बुरहानपूरमध्ये उभी राहिलीय. उल्लेखनीय म्हणजे, बेगम मुमताज यांचा मृत्यू बुरहानपूरमध्ये झाल्याचा उल्लेख मुघल इतिहासात आहे.

मध्य प्रदेशात ताजमहालची प्रतिकृती
चौकसे दाम्पत्याचं स्वप्न प्रत्यक्षात
मध्य प्रदेशातील शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योगपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आनंद प्रकाश चौकसे यांनी पत्नी मंजुषा हिला हुबेहुब ताजमहाल प्रमाणे दिसणारा एक घर भेट म्हणून दिलाय. हे घर सध्या देशात चर्चेचा विषय ठरलंय.
चौकसे पती पत्नी आग्र्याला ताजमहाल पाहण्यासाठी गेले असता तिथल्या वास्तुकलेनं ते ताजमहालच्या प्रेमात पडले. त्यानंतर ताजमहालच्या थ्रीडी इमेजप्रमाणे दिसणारं हे घर उभारण्याचा निर्णय चौकसे दाम्पत्यानं घेतला.

मध्य प्रदेशात ताजमहालची प्रतिकृती
घर उभारण्यासाठी तीन वर्षांचा काळ
हे घर उभारण्यासाठी तब्बल तीन वर्षांचा काळ लागल्याचं घर उभारणारे इंजिनिअर प्रवीण चौकसे यांनी म्हटलंय. घर बवण्यापूर्वी इंजिनिअर्सनंही ताजमहालचा एक दौरा केला होता. तसंच त्यांनी महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये ताजमहालप्रमाणेच दिसणारं आणखी एक स्मारक असलेल्या ‘बीबी का मकबरा’ला ही भेट दिली.

मध्य प्रदेशात ताजमहालची प्रतिकृती
खऱ्याखुऱ्या ताजमहालाहून तीन पटींनी लहान असलं तरी घरात चार बेडरुम, एक किचन, ग्रंथालय आणि एक मेडिटेशन रुमची व्यवस्था करण्यात आलीय.
मीनारसहीत ९० x ९० (चौरस मीटर) क्षेत्रफळावर ताजमहालप्रमाणे दिसणारं हे घर उभं राहिलंय. बेसिक स्ट्रक्चर ६० X ६० चं आहे. घराची उंची २९ फूट आहे. घराचं फ्लोअरिंग राजस्थानच्या मकराना कारागिरांच्या सहाय्यानं बनवण्यात आलंय. घरातील नक्क्षीकाम बंगाल आणि इंदूरच्या कारागिरांनी पूर्ण केलंय तर घरातील फर्निचर सूरत आणि मुंबईच्या कामगारांनी अतिशय रेखीव पद्धतीनं तयार केलंय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times