st bus reservation: ‘एसटी आंदोलनात पडळकर, सदाभाऊ खोत तेल ओतण्याचं काम करतात’, शिवसेनेचा घणाघात – msrtc workers strike bjp is working to add fuel to st bus agitation criticizes abdul sattar
पुणे : ‘एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा फटका ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बसत आहे. खरं म्हणजे एसटी सुरू व्हायला पाहिजे. एसटी कर्मचारी आणि सरकार यांच्यात मध्य व्हायला पाहिजे आणि त्यातून तोडगा निघायला हवा. राजकीय लोकांनी यात ढवळाढवळ करू नये. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे या आंदोलनात तेल ओतण्याचं काम करत आहे. त्यांचं सरकार असताना त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनात विलीगिकरण का केलं नाही.’ असा सवाल राज्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे.
राज्य मंत्री अब्दुल सत्तार आज पुणे येथे एका बैठकीला उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला असता भाजपवर टीका केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांशी मी सहमत असून सरकारने यात मार्ग काढून मध्यस्ती करायला पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे आणि जोपर्यंत ते येत नाही आणि कॅबिनेटची बैठक होत नाही तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न हा सुटणार नाही. एक महामंडळ नसून सर्वच महामंडळाचा विचार करावा लागणार आहे असं देखील यावेळी अब्दुल सत्तार म्हणाले. सांगलीत भाजपला मोठा धक्का, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत थेट घरचा रस्ता या आधी भारतीय जनता पक्षाची सत्ता होती आणि तेव्हाही याच एसटी कर्मचाऱ्यांची हीच मागणी होती. तेव्हा त्यांच्या मागण्यांचा विचार का केला गेला नाही? नवीन सरकार आल्याने गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे यात तेल ओतण्याचं काम करत आहे. विरोधात असलेल्यांचं देखील कर्तव्य असतं की सरकार आणि एखाद्या संघटनेत वाद विवाद सुरू असताना ते संपवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. पण तसं न करता भाजप हे यात तेल ओतण्याचं काम करत आहे, अशी टिका देखील यावेळी सत्तार यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पाहाटेच्या शपथविधीला आज २ वर्ष पूर्ण झाली आहे. या घटनेवर राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान केलं आहे. भारतीय जनता पक्षाने अजित पवार यांच्याबरोबर खेळ खेळला होता. पण शरद पवार यांनी तो खेळ २४ तासाच्या आत हाणून पाडला. राजकीय खेळ कसा खेळावा हा अजित पवार आणि शरद पवार यांना माहीत आहे आणि तो राजकीय खेळ या महाराष्ट्रासाठी या दोघांनी खेळला असं यावेळी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.