चंद्रपूर : मोबाईल फोनचा कधी कोण कसा वापर करेल याचा काही नेम नाही. मुंबईच्या तरूणीने मात्र यामध्ये धक्कादायक कृत्य केलं आहे. या तरूणीमुळे तरूणांची पुरती झोप उडाली आहे. सुरुवातीला नयनसूख देणारी ही तरूणी नंतर मात्र आयुष्यातील सारं सूखच हीरावून टाकते असा प्रकार चंद्रपूरमध्ये समोर आला आहे.

काय आहे नेमका प्रकार ?

मुंबईची असल्याची बतावणी करीत तरूणी व्हिडिओ कॉलकरून अश्लिल हावभावाने तरूणांना घायाळ करायची. निर्वस्त्र होवून तरुणाला १५-२० मिनिटं बोलायला भाग पाडायची. यानंतर जे घडायचं त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून तरुणांनी अशा कुठल्याही कॉल्सला बळी पडू नये अशा सूचना देण्यात आल्या आहे.

या घटनेचा तपास केला असता पोलिसही हादरले आहेत. अधिक माहितीनुसार, तरुणी व्हिडिओ कॉलवर अश्लिल चाळे करून व्हिडिओ रेकॉर्ड करायची आणि त्यानंतर त्याचा वापर तरुणांना ब्लॅकमेक करण्यासाठी करायची. व्हिडिओ व्हायरल करण्याची धकमी देत पैश्याची मागणी करायची. ती ऐवढ्यावरच थांबली नाही तर तिचे सहकारी पोलीस असल्याची बतावणी करीत तरुणीने तक्रार दाखल केल्याचे सांगतात.

डीएसकेंना येरवडा कारागृहात आमदाराने घेतला चावा? व्हायरल बातमीचं धक्कादायक सत्य समोर

या साऱ्या प्रकाराने अनेक तरुण पुरते पसले आहेत. एकट्या गोंडपिपरीत अश्या तरूणांचा आकडा मोठा असल्याचं बोललं जात आहे. बदनामीचा भितीने तरूणांनी पोलीसाकडेही पाठ फिरविली आहे.

वकीलाने केली पोलिसांत तक्रार

या साऱ्या प्रकाराने तरुण मुलं मानसिकरीत्या खचत आहेत. अश्यात गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गावातील वकील तरूणाने गोंडपिपरी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून तरुणीचाही शोध घेण्याचं काम सुरू आहे.

साताऱ्यात राजकीय खळबळ, शशिकांत शिंदेंच्या समर्थकांनी NCP कार्यालय फोडलं, अजित पवारांचा दौराही रद्द

राजकीय नेतेही ठरले बळी

या प्रकरणाची सध्या चंद्रपुरात जोरदार चर्चा सुरु आहे. गोंडपिपरीत तक्रार दाखल झाल्याने दबक्या आवाजात आता तरुण बोलू लागले आहेत. या तरुणीने जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांनाही गंडविल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता या अनोळखी मोबाईल नंबरवरून पोलीस तरुणीचा शोध घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
‘एसटी आंदोलनात पडळकर, सदाभाऊ खोत तेल ओतण्याचं काम करतात’, शिवसेनेचा घणाघात

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here