हायलाइट्स:
- ऑनलाइन बीअर मागवणे तरूणाला पडले महागात
- तरूणाच्या खात्यातून अज्ञातांनी ८४ हजार रुपये काढले
- नोएडाच्या सेक्टर ५० मध्ये राहणाऱ्या तरुणाला मोठा धक्का
- सायबर पोलिसांत तरूणाने दाखल केली तक्रार
नोएडा सेक्टर ४९ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सेक्टर ५० येथील महागुन मेस्ट्रो सोसायटीतील रहिवासी विवेक याने तक्रार दाखल केली आहे. त्याच्या घरी पाहुणे येणार होते. त्यावेळी तो घराबाहेर जाऊ शकत नव्हता. त्याने ऑनलाइन बीअर विक्री करणाऱ्या वेंडरचा संपर्क क्रमांक शोधून काढला. एका विक्रेत्याचा नंबर शोधून त्याच्याशी संपर्क साधला. बीअरच्या १० कॅन खरेदी करणार असल्याचे सांगितले. कॉल घेणाऱ्या समोरील व्यक्तीने १ कॅनसाठी १३० रुपये लागतील असे सांगितले. तसेच त्याने ऑनलाइन पेमेंट करण्यास सांगितले. विवेकनेही अॅडव्हान्स पेमेंट केले. समोरील व्यक्तीने त्याच्या मोबाइलवर एक क्यूआर कोड पाठवला.
विवेकने क्यूआर कोड स्कॅन केला. त्यावेळी त्याच्या खात्यातून वेळोवेळी ८४ हजार ८४० रुपये काढण्यात आले. त्यानंतर त्याने मोबाइलवर कॉल करून पैसे परत देण्याची मागणी केली. त्यावर काही वेळाने पैसे परत करतो, असे समोरील व्यक्तीने सांगितले. त्याने पुन्हा तरूणाला एक क्यूआर कोड पाठवला आणि स्कॅन करण्यास सांगितले. विवेकने मात्र, क्यूआर कोड स्कॅन केला नाही. त्याने आरोपींना पुन्हा कॉल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, समोरील व्यक्तीचा फोन बंद येत होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणाने पोलिसांत तक्रार दाखल केली. तसेच सायबर खात्यातही तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times