हायलाइट्स:

  • लग्न सोहळ्यात जेवणानंतर धक्कादायक घटना
  • तब्बल २५० लोकांना विषबाधा
  • ७५ रुग्णांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

नांदेड : लग्न सोहळ्यात जेवण केल्यामुळे तब्बल २५० लोकांना विषबाधा झाल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. सध्या ७५ रुग्णांवर कंधारच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

करोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्यभरात विवाह सोहळे पुन्हा एकदा प्रचंड गर्दीसह सुरू झाले आहेत. कंधार तालुक्यातील दिग्रस गावातही २१ नोव्हेंबर रोजी एक लग्न सोहळा पार पडला. मात्र या लग्नसोहळ्यात जेवण केलेल्या जवळपास २५० लोकांना विषबाधा झाली होती.

MSRTC Strike: एसटी कर्मचाऱ्यांना सरकारने दिली मोठी ऑफर; संप उद्या मिटण्याची शक्यता!

उलट्या आणि मळमळ होत असल्याने ७५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. याबाबत जिल्हा चिकित्सक डॉ. नीलकंठ भोसिकर यांनी माहिती दिली आहे.

दरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना विषबाधा झाल्याने दिग्रस गावासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. ही विषबाधा कशामुळे झाली, याबाबतची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here