हायलाइट्स:

  • मालट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने भीषण अपघात
  • वृद्ध पती-पत्नीचा जागीच मृत्यू
  • मोहोळ तालुक्यातील कोळेगाव हद्दीतील घटना

सोलापूर : भरधाव वेगाने जाणाऱ्या मालट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मोटारसायकलवरील वृद्ध पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना मोहोळ तालुक्यातील कोळेगाव हद्दीत वडवळ पाटी येथे मंगळवारी घडली. (सोलापूर अपघात ताज्या अपडेट्स)

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंबडवाडी येथील अर्जुन नामदेव थिटे व अनिता थिटे हे दोघेही सध्या सोरेगांव येथे राहण्यास असून ते शेतीच्या कामानिमित्त मूळ गाव कोंबडवाडी येथे आले होते. शेतीची व अन्य घरगुती कामे उरकून मोटारसायकल (क्रमांक एमएच १३, एके ७३३२) वरुन परत सोलापूरकडे जात असताना मोहोळहून सोलापूरकडे जाणाऱ्या भरधाव मालट्रकने (क्रमांक एपी ३९, व्ही ६८२९) पाठीमागून जोराची धडक दिली.

लग्न सोहळ्यात जेवण केल्यानंतर तब्बल २५० लोकांना विषबाधा; तालुक्यात खळबळ

या अपघातात मोटार सायकलवरील अर्जुन नामदेव थिटे (वय ६५ वर्ष) आणि अनिता थिटे (वय ६० वर्ष) हे दोन्ही पती-पत्नी जागीच मृत्युमुखी पडले.

अपघातानंतर घटनास्थळावर मृतदेहाचे तुकडे विखुरल्याने अतिशय विदारक चित्र दिसत होते. पोलिसांना याबाबतची माहिती मयताचे पुतणे सचिन शंकर थिटे यांनी दिली असून मालट्रकच्या चालकास अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास मोहोळचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय माने हे करत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here