हायलाइट्स:

  • धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला
  • हल्ल्यात वृद्ध पतीचा मृत्यू झाला असून पत्नी गंभीर
  • पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

गडचिरोली : अज्ञात व्यक्तीने वृद्ध दाम्पत्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आरमोरी येथील तहसील कार्यालयासमोरील वस्तीत सोमवारी रात्री २ वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात वृद्ध पतीचा मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी आहे. (गडचिरोली क्राईम न्यूज)

आरमोरी येथील रहिवासी असलेले गौतम ऋषी निमगडे (वय ६३ वर्ष) यांचा हल्ल्यात मृत्यू झाला, तर माया गौतम निमगडे (वय ६०) वर्ष या गंभीर जखमी आहेत. घटनेची तक्रार आरमोरी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.

गावावरून निघाल्यानंतर वाटेत मृत्यूने गाठलं; भरधाव ट्रकने मोटारसायकलस्वार पती-पत्नीला चिरडलं!

मिळालेल्या माहितीनुसार, मृतक गौतम निमगडे व त्यांची पत्नी माया निमगडे आपल्या राहत्या घरी झोपेत असताना रात्री २ ते ३ वाजताच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने दरवाजा ठोठावला. एवढ्या रात्री कोण आलं आहे, हे बघण्यासाठी गौतम निमगडे यांनी दरवाजा उघडला असता क्षणाचाही विलंब न करता हातात असलेल्या शस्त्राने या वृद्ध दाम्पत्याच्या डोक्यावर सपासप वार करून अज्ञात हल्लेखोर पळून गेला.

MSRTC Strike: एसटी कर्मचाऱ्यांना सरकारने दिली मोठी ऑफर; संप उद्या मिटण्याची शक्यता!

जखमी अवस्थेत असलेल्या दाम्पत्याने हल्ल्याची माहिती तळमजल्यावर राहत असलेल्या मुलाला फोन करून दिली. मुलाने आई-वडिलांना ताबोडतोब आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती केलं. मात्र उपचारादरम्यान गौतम निमगडे यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी असलेल्या माया गौतम निमागडे यांना ब्रम्हपुरी येथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.

सदर घटनेची तक्रार आरमोरी पोलीस ठाण्यात देण्यात आली असून, अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस विभागाने गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी श्वानपथक पाचारण केलं असून घटनास्थळाचा पंचनामा करून फिंगर प्रिंट घेण्यात आले आहेत. घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी भेट दिली.

दरम्यान, घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक पंकज बोडसे करत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here