हायलाइट्स:

  • पुण्यातील धक्कादायक प्रकार उघड
  • नर्स अंघोळ करत असताना काढला व्हिडिओ
  • सुरक्षा रक्षकाचे लाजिरवाणे कृत्य
  • बंडगार्डन पोलिसांनी सुरक्षारक्षकाला केली अटक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘करोना ड्युटी’करून निवासासाठी शासकीय विश्रामगृहात (आयबी गेस्ट हाउस) आलेली परिचारिका महिला अंघोळ करीत असताना सुरक्षारक्षकाने व्हिडिओ चित्रण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी परिचारिकेच्या तक्रारीवरून सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल झाला असून, बंडगार्डन पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

अशोक तुकाराम चव्हाण (२६, रा. आयबी गेस्ट हाउस) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका ३६ वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सोमवारी (२२ नोव्हेंबर) मध्यरात्री घडला. तक्रारदार परिचारिका या नजीकच्या सरकारी रुग्णालयात नोकरीस आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या सरकारी रुग्णालयात परिचारिका म्हणून कर्तव्यावर आहेत. सध्या त्यांना ‘करोना ड्युटी’ आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने त्यांची ‘आयबी गेस्ट हाउस’ येथे राहण्याची सोय केलेली आहे. सोमवारी मध्यरात्री त्या काम संपल्यानंतर ‘गेस्ट हाउस’ला गेल्या. ‘करोना ड्युटी’ करून आल्याने ‘गेस्ट हाउस’मध्ये गेल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम आंघोळ केली. या ठिकाणी राहणाऱ्या परिचारिकांचा हा नित्यक्रमच आहे. तक्रारदार आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेल्या. त्या वेळी तेथे ड्युटीवर असलेल्या सुरक्षारक्षकाने त्यांच्या बाथरूमच्या खिडकीजवळ येऊन, त्यांचे आंघोळ करतानाचे फोटो आणि व्हिडिओ काढले. खिडकीबाहेर कोणीतरी असल्याची शंका आल्याने तक्रारदार महिलेने बाहेर येऊन पाहणी केली. मात्र, त्यांना कोणीच दिसले नाही.

सासरा चारित्र्यावर संशय घ्यायचा म्हणून सुनेनं केलं भयानक कृत्य; संपूर्ण तालुका हादरला!

‘सीसीटीव्ही’मुळे सापडला आरोपी

दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्यानुसार पोलिसांनी तातडीने ‘गेस्ट हाउस’मधील त्यांच्या रुमबाहेरील परिसरातील सीसीटीव्ही तपासले, तेव्हा सुरक्षारक्षक बाथरूमजवळ आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने चित्रीकरण केल्याची कबुली दिली. त्यानंतर चव्हाण याला अटक करण्यात आली. बंडगार्डन पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

‘त्या’ ८ महिलांसह दहा जण एअरपोर्टवर उतरले; झडती घेतली अन् सापडलं मोठं घबाड
बीअर ऑनलाइन मागवली; थोड्या वेळात मोबाइलवर आलेला मेसेज पाहिला अन् गरगरलाच!

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here