नाशिक : नाशिकमध्ये खुनाचे सत्र सुरूच आहे. नाशिकमध्ये गुंडांच्या वर्चस्व वादाच्या गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस पुत्राचा म्हणजेच सर्रास गुन्हेगार प्रवीण काकड याचा त्याच्याच मित्रांनी खून केला होता. या गोष्टीला काही तासही उलटत नाहीत तोच लगेचच म्हसरूळमधील आरटीओ ऑफिस येथील परिसरात पुन्हा एका इसमाचा खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे. (नाशिकमध्ये आज खुनाची बातमी मित्राने आपल्या मित्राची हत्या केली गुन्हा बातम्या)
मिळालेल्या माहितीनुसार, १२:३० च्या सुमारास डोक्यात क्रूरपणे दगड घालून हत्या केल्याचे समोर आले आहे . सदर खून हा राजेश उर्फ राजू वकील शिंदे वय ३४ नामक व्यक्तीचा झाल्याचे समजत असून राजू हा भराडवाडी शाहू नगर सप्तरंग सोसायटीच्या मागे आरटीओ ऑफिस येथे राहत होता. त्याचे भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाला विक्रीचे छोटे दुकान होते. हा खून देखील वर्चस्व वादाच्या कुरपतीतून झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. एसटी संपावर आज तोडगा निघणार?; ११ वाजता महत्त्वाची बैठक हल्लेखोरांनी हल्ला केल्यावर जोपर्यंत त्यांना तो मृत आहे समजत नाही तोपर्यंत त्याच्या डोक्यात व चेहऱ्यावर दगडाने मारत होते. जेव्हा त्यांना व्यक्ती मृत झाल्याची खात्री पटली, तेव्हा तिथून पळ काढला आणि फरार झाले. मारेकरी नेमके कोण आहे? हे अजून समजले नसून पोलीस त्यांच्या शोधात आहे. या दोन्हीही घटनेनंतर म्हसरूळ पंचवटी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खुनाच्या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त मधुकर गावित पंचवटी येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिताराम कोल्हे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेतली. परंतु, पोलिसांना व्यक्ती हा मृत आवस्तेत आढलून आल्याचे दिसले. यानंतर आता खुनाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. (Nashik murder news today friend killed his friend crime news)