करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खबरदारी म्हणून विद्यार्थ्यांना १५ मार्चपर्यंत वसतिगृह रिकामे करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत, असं आयआयटी दिल्लीतील विद्यार्थ्यांशी संबंधित असलेले डीन राजेश खन्ना यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांनी फक्त आपल्या रुमच्या रजिस्टरमध्ये नोंद करावी आणि मेसचा फॉर्म भरावा. रुम खाली करण्याची आवश्यता नाही, असं ते म्हणाले.
आयआयटी दिल्लीने ३१ मार्चपर्यंत सर्व वर्ग आणि आयोजित कार्यक्रम स्थगित केले आहेत. पण पीएचडीचे विद्यार्थ्यांचे संशोधन अंतिम टप्प्यात असेल तर ते वसतिगृहात राहू शकतात. परिसरात राहणारे विदेशी विद्यार्थीही राहू शकतात, असं खन्ना यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, देशातील करोना रुग्णांची संख्या वाढून ८२ झालीय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिलीय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times