परभणी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना फोनवरून राजीनामा दिल्याचे समजते. दरम्यान, दुरांनीच्या रजिनाम्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ माजली असून उलटसुलट चर्चाना वेग आला आहे.
दुरांनी यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुरांनींची समजूत काढली जाते? की यांचा राजीनामा स्वीकारला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एकूणच दुर्रानी यांनी आज सकाळी टाकलेल्या राजीनामा बॉम्बनंतर मात्र जिल्हाभरात एकच चर्चांना उधाण आलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times