हायलाइट्स:
- करोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम
- संक्रमितांत ५३ शालेय विद्यार्थीनींचा समावेश
- एमबीबीएसचं शिक्षण घेणारे २२ विद्यार्थीही संक्रमित
हे विद्यार्थी ओडिशाच्या सुंदरगढ जिल्ह्यातील रहिवासी आहे. सरकारी अनुदान प्राप्त शाळेतील ५३ विद्यार्थिनी तसंच संबलपूरमध्ये वीर सुरेंद्र साई वैद्यकीय विज्ञान आणि संशोधन संस्था ‘बुर्ला’मध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेणारे २२ विद्यार्थी गेल्या तीन दिवसांत करोना संक्रमित असल्याचं समोर आलं आहे. या मुलांना कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. संस्थेत नुकतंच आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक कार्यक्रमाद्वारे संक्रमणाचा फैलाव झाल्याचा संशय अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे तत्काळ एका बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिल्यानंतर प्रशासनालाही मोठा धक्का बसलाय.
सेंट मेरी गर्ल्स स्कूलच्या संचालक सिस्टर पेट्रिका यांनी दिलेल्या माहितीनुसार, करोना विषाणूनं संक्रमित आढळलेल्या मुलींना क्वारंटाईन ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या उपचारासाठी विशेष सोय काळजी घेतली जातेय. मुली करोना संक्रमित आढळल्यानंतर एका आठवड्यारसाठी शाळा बंद करण्यात आलीय. संक्रमित आढळलेल्या मुली इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या वर्गात शिकतात.
ओडिशामध्ये मंगळवारी एकूण २१२ करोना संक्रमित रुग्ण आढळले. त्यानंतर राज्यातील एकूण संक्रमितांची संख्या १० लाख ४७ हजार ३८६ वर पोहचलीय. नव्या संक्रमितांत ७० मुलांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एव्हान ८३९६ रुग्णांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times