औरंगाबाद : औरंगाबाद येथे सी बँड डॉपलर रडार ( C Band doppler Radar ) बसविण्यास संदर्भात केंद्र सरकारच्या पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाने परवानगी दिली असून खुलताबाद तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या म्हैसमाळ येथे हे रडार बसविले जाणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड ( Dr. Bhagwat Karad ) यांनी दिली आहे. तर याचा मोठा फायदा मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे.

तत्कालीन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर ( Prakash Jawadekar ) यांच्याशी चर्चा करून सी बँड डॉपलर रडार संदर्भात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी आग्रही मागणी केली होती. या रडारच्या माध्यमातून हवामाना बद्दलची अचूक माहिती मिळणार आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या कृषी क्षेत्राच्या विकासात हा निर्णय मैलाचा ठरणार आहे. तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील भूभागातील हवामानाचा अचूक अंदाज घेणे सोपे जाईल ज्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारची डॉपलर रडार यापूर्वी केवळ नागपूर, गोवा, मुंबई, सोलापूर या ठिकाणीच उपलब्ध आहे.

राष्ट्रवादीला मोठा फटका! जिल्हाध्यक्ष आमदारांचा राजीनामा, राजकारणात खळबळ
असा होणार फायदा…

भारतीय हवामान खाते आणि विज्ञान मंत्रालय यांच्या माध्यमातून म्हैसमाळ येथे सी बँड रडार बसविण्यात येणार आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासंदर्भात अत्यंत महत्त्वाची भूमिका सी बँड डॉपलर रडार निभावणार आहे. किमान तीनशे ते चारशे किलोमीटरचा भूभाग किंवा परिघ या रडारच्या नियंत्रणात येणार असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी पंधरा कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

परिणामी शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या संदर्भात अचूक माहिती या रडारच्या माध्यमातून मिळणार आहे. तसेच मराठवाडा वीभागामध्ये सातत्याने पडणारा दुष्काळ आणि अतिवृष्टी मुळे शेतीचे प्रचंड नुकसान होते.मात्र आता शेतकऱ्यांना सी बँड रडारमुळे हवामाना बद्दलची अचूक माहिती मिळणार असून, त्यामुळे ते अलर्ट राहू शकतात.

नाशिक हादरलं! मित्रांनीच केलं मित्राला ठार, जीव जाईपर्यंत चेहऱ्याला दगडाने ठेचलं

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here