सोलापूर : एमआयएम पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी आलेल्या पक्षप्रमुख खासदार खासदार असद्दुदीन ओवेसी यांना सोलापूरात पोलीसी कारवाचा सामना करावा लागला. शहरात प्रवेश करताना विना नंबर प्लेटच्या गाडीतून प्रवास केल्यामुळे ही २०० रुपये दंड वसुली करत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. यानंतर मात्र उत्तम कामगिरी केल्यामुळे सोलापूर आयुक्तांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याचे कौतूक करत त्याला ५ हजार रुपये बक्षिस म्हणून दिले आहेत.
सोलापूर शहर वाहतूक शाखेनं त्यांच्या गाडीवर ही कायदेशीर कारवाई केली. शासकीय विश्रामगृहावर वाहतूक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ओवेसींच्या गाडीला केवळ २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. मंगळवारी सोलापूरात आगामी महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षाच्यावतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी असददोद्दीन ओवेसी हैदराबादहून सोलापूरात आले होते. राष्ट्रवादीला मोठा फटका! जिल्हाध्यक्ष आमदारांचा राजीनामा, राजकारणात खळबळ यावेळी त्यांनी हैद्राबाद नाका ते सोलापूर शासकीय विश्रामगृहापर्यंतचा प्रवास विना नंबर प्लेटच्या गाडीतून केला. त्यामुळे त्यांच्या लँड रोव्हर गाडीवर सोलापूर शहर वाहतूक शाखेनं दोनशे रुपयांची दंडात्मक कारवाई केली. त्यानंतर त्यांच्या गाडीला टीएस ११ ईव्ही ९९२२ या नंबरची नंबरप्लेट लावली.