प्रभाकर घार्गे यांच्या दोन मुली प्रिती घार्गे तर छोटी प्रिया घार्गे यांनी जिल्हा बँक निवडणुकीत जीवाचं राण केलं. वडिलांनी जी काही माणसं जपली त्यांना सोबत घेत प्रचाराचा धडाका लावला. यामध्ये त्यांना त्यांच्या आई इंदीरा घार्गे यांची खंबीर साथ मिळाली. त्यांनी मतदारांना भावनिक साद घातली. यामुळे प्रिती आणि प्रिया यांना वडिलांना विजय मिळवून देण्याच्या मार्ग आणखी सोपा झाला.
प्रिया घार्गे आणि प्रीती घार्गे यांनी राजकारण काय असतं हे अनुभवलं. ज्या वयात मित्र मैत्रीनींसोबत मज्जा मस्ती करायचं वय आहे, त्याच वयात राजकीय संघर्ष काय असतो, राजकीय प्रेशर कसं येतं, आपल्याच माणसांकडुन येणारी संकटं हे सगळं या दोघींनी अनुभवलं आणि यावर अगदी थंड डोक्यानं निर्णय घेत संकटांवर मात सुद्धा केली. प्रभाकर घार्गे यांच्या साथीने राजकारणात मोठे होण्याचे काम ज्या लोकांनी केलं तेच त्यांच्या विरोधात या ठिकाणी उभे राहिल्याने विजय सोप्पा नव्हता, हे या दोघींना माहिती होतं.
यामध्ये प्रभाकर घार्गे हे तब्बल ११ मतं जास्त घेऊन निवडुन आले आणि प्रिती, प्रिया या दोघींनी वडिलांची प्रतिष्ठा राखण्यासाठी केलेल्या संघर्षावर गुलाल पडला. राजकारणातील वडिलांची प्रतिष्ठा जपण्यासाठी केलेला हा संघर्ष राजकारणात येणा-या युवा पिढीला खरोखर प्रेरणा देणारा आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times