नांदेड : नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गवर पार्डी नजीक दुचाकी खड्डयात आदळल्याने पाठीमागे बसलेली महिला जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ५८ वर्षीय जनाबाई खोकले असे मृत महिलेचे नाव आहे. गेल्या काही दिवसात राष्ट्रीय महामार्गवरील रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून गुत्तेदाराच्या नियोजनाअभावी अनेकांचे बळी गेले आहेत. सहस्त्रकुंड परिसरातील वाळकी बुद्रुक येथील जनाबाई मारोती खोकले (वय-५३) व कोंडीबा मारोती खोकले ( वय-२८) आई-मुलगा हे दोघेजण मोटरसायकलवर काही कामानिमित्ताने कळमनुरी येथील पाहुण्यांकडे गेले होते. यावेळी ही धक्कादायक घटना घडली.

MSRCT strike news : औरंगाबादमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी आगारात वाटले पेढे, नेमकं कारण काय?
कळमनुरी ते भोकर मार्ग वाळकी बुद्रुक गावाकडे जात असताना नांदेड नागपूर महामार्गावरील पार्डी या गावाजवळ रस्त्यावर पडलेल्या खड्डयात मोटरसायकल आदळून पाठीमागे बसलेल्या जनाबाई खोकले उसळून पडल्या. त्यांच्या डोक्याला जब्बर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
वडिल जेलमध्ये असतानाही लेकींनी विजय खेचून आणला, सातारा जिल्हा बँक निवडणुकीची राज्यभर चर्चा

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here