लखनौ: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ अगोदर काँग्रेसला जोरदार धक्का बसलाय. इतकंच नाही तर गांधी कुटुंबीय आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या रायबरेली मतदारसंघात मोठी राजकीय उलथापालथ झालीय. रायबरेली सदर मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार अदिती सिंग या भाजपमध्ये दाखल झाल्यात.

गेल्या काही काळापासून अदिती सिंह यांची भाजपशी जवळीक वाढल्याचं दिसून येत होते. आज औपचारिकरित्या अदिती सिंह यांनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलंय.

अदिती सिंह यांच्याशिवाय आझमगडच्या सगडी मतदारसंघाच्या बसपाच्या आमदार वंदना सिंग यांनीदेखील भाजपचा मार्ग धरलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्या उपस्थित या दोन्ही महिला नेत्यांनी भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला.

Parliament Session: मोदी सरकारला घेरण्यासाठी व्यूहरचना, सोनियांच्या घरी पक्षनेत्यांची बैठक
Farm laws repeal: ‘कृषी कायदे’ रद्दबादल ठरवणाऱ्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी

२०१७ साली अदिती सिंह रायबरेली मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. आदिती सिंह यांची ओळख म्हणजे त्या प्रदेशातील ‘बाहुबली’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अखिलेश सिंह यांच्या सुपुत्री आहेत. तब्बल पाच वेळा आमदारकी मिळवणाऱ्या अखिलेश सिंह यांचं काही महिन्यांपूर्वी निधन झालंय. वडिलांच्या मृत्यूनंतर अदिती सिंह यांची भाजपशी जवळीक वाढल्याचं दिसून आलं.

काँग्रेसकडून अदिती सिंह यांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी अगोदरच विधानसभा अध्यक्षांना पत्र धाडण्यात आलं होतं. उल्लेखनीय म्हणजे, रायबरेली हा मतदारसंघ काँग्रेसचा सुरक्षित मतदारसंघ समजला जातो. या जागेवर विजय मिळवणं अद्याप भाजपला शक्य झालेलं नाही. अदिती सिंह यांच्या रुपात या जागेवर भाजपला एक मोठा चेहरा सापडला आहे.

काही दिवसांपूर्वी अदिती सिंह यांनी कृषी कायद्यांविषयी बोलताना काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांच्यावरही निशाणा साधला होता.

कृषी कायदे माघारी घेण्याच्या घोषणेनंतरही प्रियांका गांधी यांना समस्या आहेत. नेमकं त्यांना काय हवं? हे त्यांनी स्पष्ट करायला हवं. त्या या प्रकरणात केवळ राजकारण करत आहेत, असं म्हणत प्रियांका गांधी यांच्याकडे मुद्दे नसल्याची टीका अदिती सिंह यांनी केली होती.

प्रेमासाठी वाट्टेल ते! व्हिजाशिवाय बांगलादेशातून महिला भारतात, दीड वर्षांनी सत्य समोर
‘देवस्थानम बोर्डा’चा वाद : भाजप मंत्र्याच्या घरासमोर पुरोहितांचं ‘शीर्षासन’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here