मुंबई: हिंदी सिनेसृष्टीत सध्या अनेक जोड्या लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. पत्रलेखा आणि राजकुमार राव यांचं लग्न नुकतच पार पडलं. तसंच आलिया भट-रणबीर कपूरही पुढच्या वर्षी लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. असं असलं तरी सर्वात जास्त चर्चा सुरू आहे कतरिना कैफ-विकी कौशल यांच्या लग्नाची.

मधुरा वेलणकरचं १२ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन, झळकणार ‘या’ मालिकेत
कतरिना कैफ-विकी कौशल या दोघांनीही लग्नाबद्दल कोणताही खुलासा केला नसला तरी या जोडप्यानं लगीनगाठ बांधायचं निश्चित केलं असून हा सोहळा त्यांचे अत्यंत जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत होणार असल्याची चर्चा आहे. इतकंच नव्हे तर शाही विवाहसोहळ्यापूर्वी कतरिना आणि विकी कोर्टात लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विकी आणि कतरिना मुंबईतील कोर्टात लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. कतरिनाच्या जवळच्या मित्रानं या वृत्ताला काही अंशी दुजोरा दिला आहे. राजस्थानमध्ये लग्नकरण्यापूर्वी विकी आणि कतरिना कायदेशीर पद्धतीनं एकत्र येत लग्न करणार आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here