महिलेला तिच्या मुलामुळे करोनाचा संसर्ग झाला होता. तिचा मुलगा जपान, जिनेव्हा आणि इटलीचा दौरा करून दिल्लीत घरी परतला होता. तपासणीत त्याला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. तो ४६ वर्षांचा आहे. त्याच्या कुटुंबातील सर्वांची करोनाची तपासणी करण्यात आली. पण आईला सोडून कुणालाही करोनाची लागण झाली नसल्याचं तपासणीत स्पष्ट झालं. यानंतर मुलावर आणि त्याच्या आईवर राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू होते. यात आईचा करोनामुळे मृत्यू झाला. भारतात करोनामुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे.
दरम्यान, केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यात करोनाच्या तपासणीसाठी दाखल झालेले दोन विदेशी पर्यटक पळून गेलेत. त्यांना सर्दी आणि ताप होता. करोनाची चाचणी करण्यासाठी त्यांना दाखल केलं होतं. दोघांचं वय २० ते २२ वर्ष होतं, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.
देशात ८१ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. केरळमधील तिघांना आणि दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमधील ७ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलंय. करोनाची लागण झालेल्या ८१ जणांमध्ये ६४ भारतीय आहेत. तर १६ जण इटलीचे आणि १ कॅनडाचा नागरिक आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times