हायलाइट्स:

  • गळफास घेऊन तरुणाने केली आत्महत्या
  • २३ वर्षीय तरुणाच्या आत्महत्येनं खळबळ
  • पोलिसांकडून अधिक तपास सुरू

लातूर : शेतातील झाडाला गळफास घेऊन एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील चिखली इथं ही घटना घडली. भीमराव बळवंत डाकोरे (वय २३ वर्ष, रा. हिप्परगा, ता. बिलोली) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. (लातूर न्यूज टुडे)

चिखली-कोपरा रस्त्यालगत असलेल्या एका शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन भीमराव डाकोरे याने आपलं जीवन संपवलं. याबाबतची माहिती चिखली येथील पोलीस पाटील संग्राम बरूरे यांनी पोलीस स्टेशनला दिली.

Breaking: परमबीर सिंग अखेर ‘या’ ठिकाणी सापडले!; लवकरच मुंबईत परतणार

याप्रकरणी माहिती मिळाल्यानंतर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आलं.

दरम्यान, या तरुणाने नेमकं कोणत्या कारणातून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं, याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही. या घटनेचा पुढील तपास सपोनि शैलेश बंकवाड यांच्या आदेशाने पोहेका डोईजड करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here