कोल्हापूर : खून, खुनाचे प्रयत्न, मारामारी, खंडणी, खासगी सावकारकी असे ४८ गंभीर गुन्हे असलेल्या भास्कर डॉन गँगला कोल्हापूर पोलिसांनी मोक्का लावला आहे. भास्कर गँगने मागील आठवड्यातच मुंबईतील सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाचा प्लॉट हडप करण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली होती. (Kolhapur Crime Latest News)

गँगचा म्होरक्या अमोल महादेव भास्कर (वय ३८), त्याचे वडील महादेव शामराव भास्कर (६१), भाऊ अमित उर्फ पिंटू महादेव भास्कर (३३), चुलता शंकर महादेव भास्कर (५३), संकेत संदेश व्हटकर (२२) या पाच जणांविरोधात मोक्काचा प्रस्ताव राजारामपुरी पोलिसांनी तयार केला होता. भास्कर डॉन गँगचा प्रमुख अमोल असून या गँगच्या विरोधात खून, खुनाचे प्रयत्न, जबरी चोरी, गर्दी मारामारी, चोरी, घरफोडी, खंडणी असे ४८ गुन्हे दाखल आहेत.

Ukrainian Girl Dies: बाराव्या मजल्यावरून पडून युक्रेनच्या तरुणीचा मृत्यू; अंधेरीच्या डी. एन. नगरमधील घटना

पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी मोक्काचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे पाठवला. त्यांनी प्रस्तावाची छाननी करुन कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे हा प्रस्ताव पाठवला. त्यांनी प्रस्तावाचा अभ्यास करुन भास्कर गँगच्या विरोधात मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास जयसिंगपूरचे डीवायएसपी रामेश्वर बेंजणे करणार आहेत.

दरम्यान, अमोल भास्कर आणि भास्कर गँगने संघटित गुन्हेगारी, खासगी सावकारी आणि दहशतीच्या जोरावर भूखंड गिळंकृत करण्याचे प्रकार केले असण्याची शक्यता असल्याने गँगच्या अत्याचारास बळी पडल्याने निर्भयपणे पुढे येऊन तक्रारी नोंदवाव्यात, असं आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here