मुंबई : आरबीआयकडून (RBI) मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या (malkapur urban cooperative bank) व्यवहारावर निर्बंध आणले आहेत. बॅंकेची आर्थिक स्थिती खराब होत असल्याने ग्राहकांना खात्याकडून 10 हजारांहून अधिकची रक्कम काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हे निर्बंध सेविंग आणि करंट खात्यांसाठी लागू आहे. रिझर्व बॅंकेकडून मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या व्यवहारावर पुढील 6 महिन्यांपर्यंत निर्बंध आणत असल्याचे परिपत्रक जारी करण्यात आलं आहे

परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, आरबीआयच्या पूर्व मंजुरीशिवाय बॅंक कोणतेही लोन रिन्यू करणार नाही. तसेच कोणतीही गुंतवणूक करणार नाही. कुणाकडूनही उधार घेणे किंवा नवीन ठेवी स्विकारणार नाही, कोणतीही मालमत्ता विकण्यासही निर्बंध घालण्यात आले आहेत.

आरबीआयचा मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला दणका, व्यवहारावर निर्बंध, राज्यात खळबळ

बॅंकेच्या व्यवहारांवर निर्बंध नाही किंवा बॅंकेचे लायसन्स रद्द केले असे देखील नाही, मात्र बॅंकेने आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

याआधी देखील बॅंकेला केवायसी संदर्भात 2 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता.  मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक 1 हजार कोटी रुपयांची ठेवी असणारी बॅंक आहे. भाजपचे आमदार चैनसुख संचेती बॅंकेच्या अध्यक्षपदी आहेत.

पुणे, औरंगाबाद, नागपूर, वर्धा, अकोला, जळगाव, भुसावळ, मेहकर, चिखली, भोकरदन, सिल्लोड, मुर्तिजापूर अशा अनेक ठिकाणी बॅंकेचं प्रस्थ आहे.

आमदार चैनसुख संचेती बॅंकेच्या अध्यक्षपदी

मलकापूर, पुणे, औरंगाबाद, नागपूर, वर्धा, अकोला, जळगाव, भुसावळ, मेहकर, चिखली, भोकरदन, सिल्लोड, मुर्तिजापूर मिळून एकूण 28 ब्रांच आहेत. हजार कोटींच्या वर ठेवी असलेली ही बॅंक आहे.  अधिकचे लोन दिल्याने बॅंकेची आर्थिक स्थिती खराब होत होती. अशात आणखी स्थिती खराब होऊ बॅंक बुडू नये यासाठी आरबीआयकडून निर्बंध घालण्यात आले आहेत.  आॅगस्ट 2021 मध्ये ग्राहकांचे केवायसी नाॅर्म्समध्ये गडबडी आढळल्याने बॅंकेला 2 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता.  भाजपचे विदर्भातले मोठे नेते आणि मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती बॅंकेच्या अध्यक्षपदी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here