श्रीनगरः काश्मीरमधीर अनंतनाग जिल्ह्यात ४ दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी मिळून ही कारवाई केली.
अनंतनाग जिल्ह्यातील दियालगम गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी घेरल्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रत्युत्तरा दाखल केलेल्या गोळीबारात ४ दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. जवानांनी संपूर्ण भागाची नाकाबंदी केली असून शोध मोहीम सुरू आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times