महाराष्ट्र निवडणूक बातम्या: आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकमेकांच्या विरोधात? नाना पटोलेंच्या निर्णयामुळे राजकीय खळबळ – congress decided municipal elections will be fought on its own
औरंगाबाद : आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून स्थानिक नेते आणि कार्यकर्ते कामाला लागले आहे. मात्र, महानगरपालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वबळावर याबाबत खुलासा होऊ शकला नव्हता. पण आता काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याच ठरवलं असल्याचं समोर आलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शहरअध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांना पाठवलेल्या पत्रात स्वबळावर लढण्यासाठी तयारीला लागा असे निर्देश दिले आहे.
आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका आणि नगरपालिकीच्या निवडणूका स्वतंत्र लढवायच्या आहेत. त्यामुळे त्या पद्धतीने तयारी सुरू करा आणि स्थानिक पातळीवर कुठलेही तडजोड करायची नसल्याचे निर्देश नाना पटोले यांनी शहरअध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांना पाठवलेल्या पत्रात दिले आहेत. त्यामुळे पुढील काळात होणाऱ्या स्थानिक निवडणुकीत महाविकास आघाडी एकमेकांविरोधात मैदानात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र हादरला! औषध घेऊन घरी निघालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नराधमाने गाडीवर बसवलं आणि… औरंगाबाद, मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह राज्यातील दहा महानगरपालिका निवडणूक पुढील वर्षाच्या सुरवातीलाच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षीय कामाला सुरवात केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी या निवडणुकीत एकत्र लढणार की वेगवेगळे याकडे सर्वांचे लश लागले आहे. मात्र, पटोले यांच्या पत्रानंतर काँग्रेस नेते मात्र स्वबळाच्या तयारीला लागले आहे.