आग्रा: उत्तर प्रदेशातील आग्रा येथे धक्कादायक घटना घडली. एका २१ वर्षीय तरुणीवर तिच्या सोशल मीडियावरील मित्राने मंगळवारी धावत्या कारमध्ये बलात्कार केला. हरयाणातील पलवल येथील २५ वर्षीय तरुणावर हा आरोप आहे. ही तरूणी उत्तर प्रदेश पोलीस विभागात पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेहून परतत असताना ही घटना घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, तीन महिन्यांपूर्वीच या तरूणीची सोशल मीडियाच्या माध्यमातून या तरूणासोबत मैत्री झाली होती. मंगळवारी, आरोपी हा त्याच्या चालकासोबत कार घेऊन मथुरेत आला होता. तिला परीक्षा केंद्रावर पोहोचवून नंतर पुन्हा तिला आपल्या घरी सोडणार असल्याचे त्याने सांगितले. तरूणी त्याच्यासोबत कारमध्ये बसली. काही वेळाने त्याने काहीतरी गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तरुणी बेशुद्ध पडली. काही वेळाने ती शुद्धीवर आली. त्यावेळी आपण दिल्ली-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर कोसिकला येथे असल्याचे तिला समजले. तिने कसेबसे आपले घर गाठले. तिने सर्व हकिकत आपल्या कुटुंबीयांना सांगितली.

बाबो! पाइपमधून पाण्याऐवजी ‘पैशांचा पाऊस’; सरकारी अधिकाऱ्याच्या घरी छापा
inappropriate video viral : मित्राचा ‘तो’ व्हिडिओ सोशल मीडियावर केला व्हायरल, अल्पवयीन मित्राची झाली भयानक अवस्था

पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष चंद्र यांनी सांगितले की, कोसिकला पोलीस ठाण्यात पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार आरोपी तरूणाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तरूणीची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे. पीडित तरुणीला संशयित आरोपीच्या घरचा नेमका पत्ता ठाऊक नाही, अशी माहितीही त्यांनी दिली. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. पीडित तरुणीचा जबाब नोंदवून घेतला आहे.

मुलगी घरात एकटीच होती, अचानक गावातील तरूण घरात घुसला अन्…
दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार; व्हिडिओ काढून पीडितेला धमकावले

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here